तहसीलदार पवन पाटील यांच्या पथकाच्या कारवाईने रेती माफीयांचे धाबे दनावले…. जळगाव जामोद तालुक्यात आतापर्यंतच्या सर्वात मोठी कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रितीमाफी्यांनि हैदोस घातला होता. विनापरवाना पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा चालू होता.रेती चोरीचा नवीन प्रकार केनी मशीन द्वारे पाण्यातून रेती सर्रास काढल्या जात होती. यासंबंधी अनेक वेळा बातम्या ठोकून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला होता. तसेच चार दिवसा अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे जळगाव जामोद तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी सुद्धा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर तहसीलदार पवन पाटील यांनी पूर्णा नदी पात्रातील अवैधरेती उपसा बाबत कारवाई करण्यास सुरुवात केली. या मोहिमेसाठी कोणतेही गावातून जाणे टाळले व 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी तहसीलदार पवन पाटील व तारासिंग पवार यांच्यासह एन डी आर एफ पथक जिल्हा अधिकारी व उपजिल्हाधिकारी व उपविभागीय यांचे मार्गदर्शनात पथक तयार करून तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भरत किटे भारसाकडे, मंडळ अधिकारी सातपुते यासह तलाठी कोतवाल यांच्या पथकाने पूर्ण नदीत बोटीसह उतरवून मौजे गोडेगाव हुरसाड या भागात धडक कारवाई केली. या कारवाही दरम्यान तहसीलदार पवन पाटील यांचे पथक पाहून रेतीमाफी यांनी आपल्या वाहनासह पूर्णा नदी पात्रातून पड काढला यावेळी तहसीलदार पवन पाटील यांच्या पथकाने घटनास्थळावरून नदीपात्रातून पाण्यातून रेती काढण्याचा सक्सन पंप, दोन ट्रॅक्टर तीन केणी मशीन जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलेला आहे. सदरचे कारवाई पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे पीएसआय नारायण सरकटे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत संबंधित रेती माफी यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता…. तहसीलदार तहसीलदार पवन पाटील यांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यामध्ये अवैधरित्या रेती तस्कर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जळगाव जामोद महसूल प्रशासनाने आतापर्यंत एकही मोठी कारवाई केलेली नव्हती हे विशेष… यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी स्टार भारत लाईव्ह ला बोलताना सांगितले की मागील महिन्यात संदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या त्यामध्ये दहा वाहनांवर कारवाही करून 700 ब्रास रेती जप्त करण्यात आली. अशाच प्रकारे रेती माफीयंवार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ✍️



