महाराष्ट्र

काल ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार दाखल केलेली फिर्याद ही राजकीय द्वेषापोटी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता बि .डी. गवई यांचा गंभीर आरोप

मुक्ताईनगर येथे आ एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅली प्रवर्तन चौकात आल्यानंतर आ रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे व पदाधिकाऱ्यांनी चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले व अभिवादन करुन रॅली पुढील कार्यक्रमास मार्गस्थ झालीत्यानंतर रात्री शुभम भालेराव या युवका मार्फत प्रवर्तन चौकात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्या मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चष्म्याची दांडी तुटली असून त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून रॅलीचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक्ताईनगर शहराध्यक्ष राजेंद्र माळी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर शहराध्यक्ष लक्ष्मण (बबलू) सापधरे यांच्या विरोधात अट्रासिटीची केस दाखल केलीयावर शहरातील अनुसूचित जाती बांधवांनी पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना निवेदन दिले यात म्हटले आहे काही समजाकंटकानी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शुभम भालेराव या युवका मार्फतरॅलीच्या आयोजकांवर अट्रासिटीची केस दाखल केली आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चष्म्याची दांडीला थोडी चिर यापूर्वी पडलेली असून असे खात्रीशीर निदर्शनास आणून देऊ शकतो सदर तपास कामी पुरावा म्हणुन रॅलीचे पुर्वी नगर पंचायत मुक्ताईनगर सफाई कर्मचारी मार्फत सफाई करते वेळीचे फोटो सोबत देण्यात येत आहेत दाखल गुन्ह्याचा सखोल तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावीअसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावरसंतोष बोदडे, बळीराम गवई, रमेश गणेश, सुधाकर बोदडे, मोहन मेढे, बापू ससाणे, नंदकिशोर हिरोळे, प्रशांत भालशंकर, राजु बोदडे, रविंद्र बोदडे, ॲड कुणाल गवई, विशाल रोटे, निलेश भालेराव, दिपक ससाणे, प्रविण दामोदरे, सचिन बोदडे, राजेंद्र वानखेडे, प्रदीप सपकाळ, जीवन गणेश, विशाल बोदडे, रविंद्र भालेराव, राहुल बोदडे, विक्रम तायडे या अनुसूचित जाती समाज बांधवांच्या सह्या आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button