जळगाव शहर विकासाचा जाहिरनामा (भाग१)

जळगाव शहर विकासाचा जाहिरनामा (भाग१)
जळगाव जागृत जनमंच, जळगाव जिल्हा जागृत जनमंच हे गृप फक्त जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहे.शहरातील , जिल्ह्यातील लोक त्यात सदस्य आहेत.अनावश्यक फोटो व्हिडिओ पोस्ट टाकून बोजड होऊ नये म्हणून आम्ही,ओन्ली अडमीन केला आहे. मित्रांनो,मी लिहीतो, पोस्ट करतो.ते विचारांच्या बाबतीत एकतर्फी चालू शकते.जसे भाषण, किर्तन, प्रवचन, व्याख्यान एकतर्फी असते.पण आता जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे.तर जळगाव शहरातील लोकांचे मत त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.आपण एका ठिकाणी सभा घेऊन बोलतो.पण लोकांना वेळ मिळत नाही.म्हणून समक्ष हजर होता येत नाही.बोलायला संधी मिळत नाही.तर येथे या गृपवर आपण ती उणीव भरून काढू शकतो.तर लिहा.फक्त तुमचे म्हणणे लिहा.इकडचे तिकडचे दुसऱ्याचे तिसऱ्याचे नका फारवर्ड करू.१) जळगाव शहरातील समस्या२)त्यावर उपाय३) आर्थिक उत्पन्न४), आर्थिक खर्च५) रस्ता गटार पाणी सफाई बाबत नियोजन६) व्यापारी संकुल मधील गाळे.नियमित करणे कि बळजबरीने रिकामे करणे७)ओपन स्पेश परत घेणे कि व्यापारी तत्त्वावर भाडे घेणे८) नगरपालिका इमारती.परत घेणे कि व्यापारी तत्त्वावर भाडे घेणे.९) महानगरपालिका शाळा पुर्ववत चालू करणे किंवा बंद करणे.१०) फुटपाथ बनवणे, फेरीवाला झोन वाढवणे.११)आठवडे बाजार वाढवणे,जागा उपलब्ध करुन देणे, अधिकृत कर वसुली करणे.१२) एमआयडीसी चे संरक्षण करणे.सुविधा पुरवणे.गुंडा नेतागिरी कमी करणे, रोजगार वाढवणे.१३) महानगरपालिका सर्वच कामकाज ओपन ऑनलाईन करणे.जसे टेंडर, मंजुरी, वर्क ऑर्डर,कामाची स्थिती,बील पेमेंट ची माहिती.कम्प्लीशन .१४) प्रभाग मधे कामाची देखरेख समिती बनवणे.१५)महानगरपालिका अधिकारी ची मोव्हमेंट आधीच जाहीर करणे.नांव,पद,वाहन नंबर,चालकाचे नाव, उद्देश.१५) महापौर, उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्ष,गटनेता व नगरसेवकांंची मोव्हमेंट जाहीर करणे.१६)नोकरांचे नियमन.भरती,ड्युटी,कामाची नोंदवही भरणे.१७) नगरसेवक नसलेल्या नागरिकांना महानगरपालिका कामकाजात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणे.१८) महासभेचे लाईव्ह टेलिकास्ट करणे.१९) अधिकारी व नोकरांची केबिन ला दरवाजे न ठेवणे.पडदे काढून टाकणे.अण्टीचेंबर, जेथे काळा बाजार करतात,ते काढून टाकणे.कॉमन रेस्ट रूम बनवणे.२०)नगरसेवकांना क्षेत्र सभा अनिवार्य करणे.क्षेत्रसभा न घेतल्यास पदच्युतीचा ठराव करणे.२१) आठवड्यात एक दिवस संपुर्ण तक्रारींचा निपटारा करणे. अशा विषयांवर आपण लिहा.आपला अभ्यास लिहा.आपले सुझाव लिहा.या गृपवर टाका.शुभेच्छा वगैरे वगैरे नको.नंतर आपण या विषयावर जाहीर चर्चा करू.जळगांव बदलण्यासाठी जाहिरनामा तयार करू. जर कोणाला उघडपणे लिहीता येत नसेल तर मला वैयक्तिक नावावर लिहा.मी वाचतो.दखल घेतो….. शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव



