तेल्हारा शहरात मिट्टी को नमन,विरोंका वंदन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ,शिलाफलकाचे अनावरण

*तेल्हारा शहरात मिट्टी को नमन,विरोंका वंदन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ,शिलाफलकाचे अनावरण
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा -व्ही.एम.घोडे तालुका प्रतिनिधीतेल्हारा नगरपरिषद च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत मेरी मीट्टी मेरा देश मिट्टी को नमन,विरों का वंदन हे अभियान दिनांक 11 /8 /2023 रोजी जिल्हाधिकारी मा. अजित कुंभार याच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण दुपारी 4 वाजता मॉ जिजाऊ , पुण्य.अहिल्याबाई होळकर न.प. उद्यान तेल्हारा येथे आयोजित करण्यात आले होते. शिलावरणाचे अनावरण करते वेळी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने वंदे मातरम, भारत माता की जय ,शहीद जवान अमर रहे अमर रहे ,च्या घोषाना करण्यात आल्या होत्या या घोषनांचा आवाज अवघ्या परीसरात पसरला होता, तसेच दुपारी 4 वाजता केशव मंगलम्,हेडगेवार न.प.सभाग्रह तेल्हारा येथे 43 माजी स्वातंत्र सैनिक, आजी माजी सैनिकांचा सपत्नीक ,तथा विर माता,विर पत्नी , पोलीस कर्मचारी आदिंचा शाल,श्रीफळ,तथा पुष्पगुच्छ देऊन सहपत्निक सत्कार मा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हास्ते करुन त्यांना वंदन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी अकोट श्री बळवंत अरखराव ,श्री संतोष येवलीकर तेल्हारा तहसिलदार तथा अण्णासाहेब बोदडे उपआयुक्त पिपरी चिंचवड महानगर पालिका व श्री सतीश गावंडे मुख्यधिकारी न. प तेल्हारा आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाळेतील विध्यार्थी ,शिक्षक -शिक्षिका,पत्रकार,माजी नगरसेवक,अंगनवाडी सेविका ,शहरातील नागरिक ,न.प. अधिकारी,कर्मचारी ,महिला बचत गटांतील सदस्य,आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन, माल्यार्पण तथा दिप प्रज्वलनाने केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मा.अजित कुंभार साहेब हे असुन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशासाठी सैनिकांचे योगदान पाहता त्यांचे कौतुक केले व देशाच्या रक्षणासाठी सेवा देत असतांना जे सैनिक शहिद झाले त्यांना अभिवादन करुन त्यांना वंदन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा मुख्यधिकारी न.प.तेल्हारा सतीश गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वेरुळकर साहेब यांनी केले



