वाघ नगर मध्ये तथागत चौक येथे आज वृक्षारोपणआज १/१/२०२३ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे

वाघ नगर मध्ये तथागत चौक येथे आज वृक्षारोपण
आज १/१/२०२३ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच आंबेडकरी चळवळीतले निष्ठावान कार्यकर्ते, सामाजिक बांधिलकी जपणारे, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व, आंबेडकरी अभ्यासक आयु. युवराज सुरवाडे यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून समाजातील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाघ नगर परिसरातील, गॅस गोडाऊन जवळ तथागत चौक येथे आज वृक्ष रोपणाचा कार्यक्रम योजिला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ईश्वर वाघ यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय काष्ट्राईब कर्मचारी महासंघटनेचे विभागीय अध्यक्ष आयु. रवींद्र तायडे होते. यावेळी उपस्थित आयु. राहुल अहिरे, सुनील साळवे, राष्ट्रपाल सुरडकर, भाऊराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे सहसंघटक संजय जाधव, वंचित बहुजन आघाडीचे महा नगरध्यक्ष मनोज अडकमोल, दै. देशदूतचे पत्रकार आयु. सुशलर भालेराव, खैरनार, मनोज बिऱ्हाडे विकास सोनवणे, राजेंद्र चौधरी हे स्पत्निक अलका चौधरी इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.
कार्यक्रमाच्या अखेर मनोगत संवादात युवराज सुरवाडे यांनी माझ्या आख्या आयुष्यात असला कार्यक्रम योजीलेला मी बघितला नाही किंवा अनुभवला नाही. माझ्या आयुष्यातील हा पहिला प्रसंग आहे. अश्या प्रकारच्या भावना याप्रसंगी त्यांनी मांडल्या. हा माझा सन्मान नसून एक सच्चा आणि प्रामाणिक, निस्वार्थी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. जो कोणत्याही परिस्थितीत कितीही रक्कम देऊन खरेदी करू शकता येत नाही. आज माझ्या मित्रांनी आणि वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकारी यांनी जो कार्यक्रम घडून आणला. हा
माझ्या आयुष्यातला सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे.आणि ही शिजोरी घेऊन मी आख्य आयुष्य कार्यकर्ता म्हणूनच मिरवीत राहील. अशी भावनिक साद त्यांनी या प्रसंगी केले. सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले. असेच प्रेम आणि आशीर्वाद आपल्याकडून
सतत मिळत राहो अशी इच्छा व्यक्त करून कार्यक्रम संपविण्यात आला. आभार प्रदर्शन सुनील साळवे यांनी केले.



