मालेगाव प्रभाग क्रमांक चार मध्ये रस्ता मोकळा करून व नाली बांधुन मिळणेबाबत नगरपंचायत मुख्यअधिकारी यांना निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – मालेगाव येथील प्रभाग क्रमांक चार मधील रस्ता बांधकाम सुरू होत आहे तरी त्या रस्त्यासोबत नाली सुद्धा बांधुन देण्यात यावी असे निवेदन प्रभाग क्रमांक चार मधील अकिल पठाण शहजाद पठाण यांनी निवेदन द्वारे केले आहे या निवेदनात असे नमूद केले आहे की वरील विषयानुसार आम्ही खालील सह्या करणार विनंती अर्ज करून गांधीनगर वार्ड क्रमांक चार झोपडपट्टी जुनी दुसरी लाईन मधील शहा यांच्या घरासमोरील रस्ता बंद झाला आहे तरी आपण झोपडपट्टीचा नकाशा व रस्ता नकाशा पाहणी करून ज्या कोणाचे अतिक्रमण आहे ते पाहून रस्ता मोकळा करून द्यावा रस्ता हा खूप जुना आहे अदीपासुन डांबरीकरण होता नंतर 2005 मध्ये सिमेंट काँक्रेट रोड झाला परत नगरपंचायत ने दलित वस्ती अंतर्गत रस्ता मंजूर केला आहे शालिक गायकवाड ते नितनवरे हे कामाचे नाव आहे हा रस्ता बंद केलेला आहे तरी आपण या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता आम्हाला मोकळा करून नाली सह बांधुन व मध्ये नाली तील सिमेंट पाईप टाकून देण्यात यावे असे निवेदनाद्वारे केले आहे मुख्य अधिकारी पंकज सोनोणे यांना निवेदन देतेवेळी अखिल पठाण,सहजाद पठाण,बाळाभाऊ सावंत,शिवा उत्तम मोरे,रवी परसराम चव्हाण,पवन नितनवरे,शेख अकबर,शेख मुस्ता,नितीन चंदू आढाव,आदीच्या सह्या या निवेदनाव्दारे दिल्या आहेत.



