राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसारी

राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसारी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – वसारी-राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसारी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस एस बकाल सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे शिक्षक कावरखे सर खानझोडे सर भोंडणे सर वाघ सर गुडदे सर सतीश बकाल सर श्रीरामजी जाधव बंडाभाऊ इंगळे हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहम जाधव यांनी करून विविध विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून बकाल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पांढरे यांनी केले तर आभार आदित्य बाजड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.



