मलकापूरराजकीयविदर्भ

मलकापुर मतदार संघाचे आमदार राजेश एकडेस्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

मलकापूर:- अंगणवाडी मदतनीस,आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाकडून मिळणारे वाढीव मानधन गेल्या सहा महिन्यापासून मिळालेले नाही, जानेवारी ते मार्च पर्यंत राज्य शासनाकडून निधीची तरतूद असतांना देखील बुलढाणा जिल्ह्यातील आशा सेविकांना व गतप्रवर्तकांना मानधन वाढीपासून वंचित ठेवलेले असल्याची बाब आमदार राजेश एकडे यांनी आज २७ जुलै रोजी औचित्त्याचा मुद्दा (२१) द्वारे विधिमंडळ सभागृहात उपस्थित करीत अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने शासनाचे लक्ष वेधले.
बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसन, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी १० जुलै रोजी मागणी दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समोर निषेध आंदोलन केले होते, जानेवारी २०२३ पासून अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाकडून मिळणारे वाढीव मानधन गेल्या सहा महिन्यापासून मिळालेले नाही, जानेवारी ते मार्च पर्यंत राज्य शासनाकडून निधीची तरतूद असतांना देखील बुलढाणा जिल्ह्यातील आशा सेविकांना व गतप्रवर्तकांना मानधन वाढीपासून वंचित ठेवलेले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील आशा वर्कर्सला व गटप्रवर्तकांना त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पेमेंट शीट कुठेच दिल्या जात नसल्यामुळे अनेक आशा वर्कर्सना कामाचा पूर्ण मोबदला मिळतो किंवा नाही याबाबत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, एकीकडे प्रचंड महागाई वाढत असतांना गेल्या पाच वर्षात पोषण आहाराच्या व इंधनाच्या कींमतीत शासनाने कुठलीही वाढ केलेली नाही, डिजिटल कारभाराच्या नावाखाली पोषण ट्रॅक्टर नावाचा एक सदोष ॲप सेविकांना दिलेला आहे, ॲप सोबत सुसंगत मोबाईल शासनाने दिलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाने सव्वा वर्षांपूर्वी ग्रॅज्युएटी बाबत सकारात्मक निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासन उदासीन आहे, शासनाच्या अनास्थेमुळे अंगणवाडी कर्मचारी , आशा सेवीका व गटप्रवर्तक संतप्त झालेले आहे शासनाप्रति अंगणवाडी सेविका मदतीचा व गटप्रवर्तक यांचे मध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे, यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार राजेश एकडे यांनी लावून धरली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button