खानदेशजळगावा जिल्हासामाजिक

नूतन मराठा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर आहे

नूतन मराठा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर आहे

: जयसिंग वाघ

———————–———————–

जळगाव :-नूतन मराठा महाविद्यालय हे मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर असून प्रशिक विदयर्थी संघटनेची स्थापना याच महाविद्यालयात झाली आहे , सत्यशोधक समाज ही चळवळ सुद्धा याच महाविद्यालयातुन चालत असे , राज्यस्तरीय सत्यशोधकि साहित्य संमेलन यशस्वी करण्यात तसेच मागास व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना फक्त दहा रूपयात प्रवेश देवून एक नवी ओळख निर्माण केली असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले . नूतन मराठा महाविद्यालयातिल माजी विदयर्थी मेळावा ३० जुलै रोजी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असता वाघ बोलत होते . या प्रसंगी अनिल पाटील , प्रा. सुनील गरुड़ , जयप्रकाश महाडिक , पल्लवी शिंपी , कांचन धांडे , विकास पवार , शशिकांत शिंदे यांचीही भाषणे झाली .डॉ. राजू पाटील , प्रा. डॉ. डी. आर. चव्हाण , प्रा. प्रवीण शिंदे , प्रा. डॉ. नितिन बाविस्कर , प्रा. डॉ. इंदिरा पाटील , मंगेश सालुंके , साजिद शेख , हर्षल पाटील आदि मान्यवर मंचावर हजर होती . कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेवून पुढं मंत्री , आमदार , कुलगुरु , विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष , निष्णात वकील , न्यायाधीश झाले हे आम्हास गौरवास्पद आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख , आभार प्रदर्शन प्रवीण शिंदे यांनी केले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button