बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

प्रिंट मिडीया प्रतिनिधींच्या पत्रकारीतेचा रौप्य महोत्सव

निबंध स्पर्धा बुरुंगले विद्यालयात शेगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव

शेगांव संतनगरीतील प्रिंट मिडीयात पत्रकारीता करित असलेल्या अनेक प्रतिनिधींना या क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्या अनुषंगाने रौप्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय शेगाव तालुका पत्रकार संघाकडून घेण्यात आला असून महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज बुधवारी येथील श्री मस्कुजी बिरुजी बुरंगले विद्यालय आणि श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वाढत्या डिजिटल जगात मुद्रित पत्रकारितेचे भविष्य, पत्रकारितेत सोशल मीडियाची भूमिका, आणि डिजिटल पत्रकारितेचा इतिहास या विषयांवर

विद्याथ्यांच्या दोन गटांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत ३०० विद्याधर्थी यामध्ये सहभागी झाले. विद्यालयाच्या प्राचार्य सौ. मीनाक्षीलाई मुरुंगले, पर्यवेक्षक एस. एम. निळे, नग. एस. एस. मांडवे, एम डी कडाळे, एस. डी. चोपडे, ए.जी. क्षीरसागर यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यव तथा डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, मराठी पत्रकार परिषदेचे

विभागीय संघटक राजेश चौधरी, शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव नंदू कुळकर्णी, माजी अध्यक्ष धनराज ससाने, संजय ठाकूर, राजकुमार व्यास, ज्ञानेश्वर ताकोते, प्रशांत खत्री, इस्माईल शेख, श्याम पहुरकर विशाल आसोलकर, गोपाल हिंगणे यांच्या निरीक्षणात ही परीक्षा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष फहीम देशमुख यांनी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button