महाराष्ट्र

तानसा धरण भरले….

तानसा धरण भरले….

स्टार भारत लाईव्ह ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर

मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील तानसा धरण बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनातर्फे धरण परिसरातील आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या पातळीत वाढ झाल्याने धरण ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे सद्यस्थितीत धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button