चंदन तस्करी करणारे तिनं जण ताब्यात…

चंदन तस्करी करणारे तिनं जण ताब्यात…
वनविभागाची चौकशी सुरू
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव – : मालेगाव शहरातील शिव चौक परिसरातुन मोटार सायकल वर चंदणाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची कामगीरी १९जुलै रोजी मालेगाव पोलिसांनी बजावली मालेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे आपल्या सहकाऱ्यां सह मंगळवार दिनांक १८ जुलै रोजी रात्री दरम्यान गस्तीवर असताना शहरातील शिव चौक परिसरातुन मोटार सायकल वर आढळलेल्या तिनं इसमांना थांबवून त्याची विचारपूस केली यावेळी त्यांच्या कडे प्लास्टिकच्या पिशवीत चंदनाच्या वृक्षांचे सात नग व आला आढळून आले त्यांच्या कडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव हरीदास रामचंद्र खटोने,भास्कर केशव जाधव व वैभव भगवान ठाकरे असुन राहणार चांडस ता.मालेगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले दरम्यान पोलिसांनी या तिनही संशयीतां कडुन २९ किलो १२४ग्राम वजनाचे चंदन लाकुड अंदाजे किंमत ८७३७.२० रूपये किंमतीचे मालासह १८जुलैच्या रात्री ताब्यात घेतले त्यांनंतर १९जुलै रोजी वनविभागाच्या हवाली केले त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास मोरे यांनी तिनही तस्करां विरुद्ध वन कायदा नुसार गुन्हा दाखल करून त्यांच्या कडे अधिकची चौकशी केली असता सदरचे चंदनाचे लाकुड मालेगाव शहरा लगतच असलेल्या कोल्ही-बोर्डी तलाव भिंतीच्या खालच्या भागातून वाहणाऱ्या नाल्याच्या काठा वरून आणल्याचे चौकशी अंती सांगितले यावरुन वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत तिन्ही इसमांना सोबत घेऊन घटना स्थळी पाहणी केली घटनेचा अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमाना वर्तुळाचे क्षेत्र सहाय्यक पवार करीत आहेत.



