Uncategorized

शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा तसेच शेगांव आगाराला नविन बसेस देण्यात याव्यात विभागीय नियंत्रक बुलढाणा यांना मनविसेची मागणी

शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा तसेच शेगांव आगाराला नविन बसेस देण्यात याव्यात विभागीय नियंत्रक बुलढाणा यांना मनविसेची मागणी

शेगांव आगारास बसेस कमी असल्याने अनेक बस फेर्या बंद आहेत

विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

नांदुरा: तालुक्यातील भोटा येथे खामगांव आगाराची बससेवा सद्यस्थितीत सुरू आहे, परंतु भोटा येथून जवळच असलेल्या कठोरा पर्यंत शेगांव आगाराची बससेवा सुरू आहे. सदर बसचा थांबा हा भोटा पर्यंत वाढविण्यासाठी व शेगांव आगाराला आणखी काही नविन बसेस ह्या वाढवून देण्यात याव्यात जेणे करून दर एकादशी,गुरुवार,शनिवार-रविवारी होत असलेल्या प्रवासी संख्येतील वाढीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेसची कमतरता होऊ नये तसेच बस नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होता कामा नये म्हणून शेगांव आगारास नविन बसेस वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक १८ जुलै २०२३ रोजी विभागीय नियंत्रक बुलढाणा यांना निवेदन दिले आहे.
सदर कठोरा-शेगांव बससेवा भोटा पर्यंत सुरू झाल्यास पंचक्रोशीतील भोटा, दादगांव, रोटी, हिंगणा इसापूर, हिंगणा खोंड, हिंगणा भोटा, कालवड, माहुली, टाकळी (पारस्कर) या गावांमधील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाहीच शिवाय शेगांव आगारास निविन बसेस उपलब्ध करून दिल्यास शेगांव तालुक्यातील तसेच इतरही तालुक्यात सुरू असलेल्या शेगांव आगाराच्या अनेक ग्रामीण भागातील बंद असलेल्या बस सेवेच्या फेर्या पुन्हा सुरळीत करता येतील करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनात तसेच शेगांव आगाराच्या मागणीनुसार विभागीय नियंत्रक यांना मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, व मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी वरील आशयाचे निवेदन दिले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईलने आंदोलन करणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button