Uncategorized

शेगाव येथे गुटखा विक्री करणाऱ्यास पकडले;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव शहर पोलिसांनी एका गुटखा व्यावसायिकाच्या घरी छापा मारून गुटखा त्याचे घरातून प्रतिबंधित गुटख्याचा ४२,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज दुपारी ११.३० वाजता सुमारास पोलिसांनी स्थानिक भुतबंगला परिसरातील रहिवासी विष्णू नारायण मेतकर (३६), याचे राहते घरी पोलिसांनी छापा मारून त्याचे विक्रीस ठेवलेला प्रतिबंधित केलेला गुटख्याचा माल जप्त केला. ज्यामध्ये वाह पान मसाला सुपारीचे ५५ पॅकेट,

घरातून

४२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

तंबाखूचे ५५ पॅकेट, विमल पान मसालाचे ८० पॅकेट, व्ही१२ चे ८० पॅकेट, नजर गुटखाचे १५ पॅकेट असा एकूण ४२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विष्णू नारायण मेतकर याचे विरूध्द कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादंवि सहकलम २६ (२), (खत), ५९ (ख) अन्नसुरक्षा व मानके कायदा सन २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे

मार्गदर्शनात पो.स्टे. डीबी पथकाचे पीएसआय राहुल कातकाडे, पोकॉ संजय करूटले, पोना गणेश वाकेकर, राहुल पांडे, पोकॉ नरेश तायडे, विजय साळवे व मपोकॉ वंदना यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय राहुल कातकाडे हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button