आज अभियान चंद्रयान -3 LVM3 M4 चे 2 वाजून 35 मिनिटांनी होणार प्रक्षेपण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस (तेल्हारा तालुका प्रतिनिधी- व्ही एम घोडे)
तेल्हारा दि.14 आज 14 जुलै शुक्रवार रोजी ठीक 2 वाजून 35 मिनिटांनी सतीश धवन अंतराळ केंद्र शार, श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार असून संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागलेले आहे वेळेची उलटी मोजणी सुरू झालेली आहे अगदी बोटांवर मोजता येणारा अवधी बाकी आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था नी चंद्रयान -3 LVM3 M4 चे लॉन्च रिहर्सल दि.11 जुलै 2023 ला रियर्सल पुर्ण केले असून हे करते वेळी यामध्ये रॉकेट लॉन्च केल्या गेले नव्हते ,ही रिहर्सल फक्त सर्व केंद्रांना आपला क्रम माहिती असावा याकरिताच होते.
चंद्रयान-3 हे 10 चरणांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणार आहे .अभियान चंद्रयान -3 मध्ये मुळात लखनऊच्या रहिवासी असणाऱ्या रितू करिधाल या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर असणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार त्या भारतीय वेळेनुसार दुपारी ठीक 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान -3 सह पृथ्वीवरून प्रक्षेपण करणार आहेत भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) आता अभियान चंद्रयान -3 च्या लॉन्चिंग च्या तयारीमध्ये लागलेले आहेत अवघ्या काही तासातच या चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे.
अभियान चंद्रयान-3 च्या प्रक्षेपण वेळी शार, श्रीहरी कोठा येथे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमंत्रित आहेत व ते या ठिकाणी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. अभियान चंद्रयान -3 चे प्रक्षेपण व्यवस्थित रित्या यशस्वी झाले तर चंद्रयान-3 हे चंद्रावरील दक्षिण ध्रुव प्रदेशात अवतरण करेल व हे सॉफ्ट लँडिंग करणारे चंद्रयान-3 प्रथम अभियान ठरणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 14 जुलै रोजी दुपारच्या 2 वाजून 35 मिनिटांनी अभियान चंद्रयान-3 शार श्रीहरीकोटा येथून भरारी घेणार आहे ,सर्व यशस्वीरित्या पार पडले तर हे चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन केंद्राद्वारे तयार केले गेलेले चंद्रयान -3 असून या अभियाना मध्ये चंद्रयान-2 प्रमाने 1 विक्रम लैंडर आणि 1 रोव्हर असणार आहे ,फक्त यावेळी यामध्ये ऑर्बिटर या साधनाचा वापर नसणार आहे हे चंद्रयान-3 चंद्रावरील माहिती गोळा करण्याचे कार्य करेल. चंद्रयान -3 चे विस्तारित लोड वजन प्रो. 2148 किलोग्राम ,विक्रम लेंडर मॉडेल 26 किलोग्राम ,रोवर सह १७५२ किलोग्राम ,एकूण 3900 किलोग्राम आहे .व याला लागणारी ऊर्जा 758 W, विक्रम लैंडर मॉडेल 738W , रोव्हर 50 W याप्रमाणे आहे .चंद्रयान -2 च्या अपयशानंतर रॉकेट LVM3 M4 चंद्रयान-3 चे नवीनतम निर्माण करण्यात आले आहे. अभियान चंद्रयान तीन मध्ये जे विक्रम लैंडर मधील सोलर प्रज्ञान रोव्हर आहे हे सोलर रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारी एक गाडी आहे. तसेच भारतीय अंतराळ वैज्ञानिकांची चंद्रावर प्रथम पाऊल ठेवण्याची हि पहिली पायरी असणार आहे ,अभियान चंद्रयान -3 LVM3 M4 या अभियानाला सुमारे सहाशे कोटी रुपयाचा खर्च लागत आहे ही भारताची कमी खर्चात खूप मोठी उपलब्धता असणार आहे.
विश्वभारती विज्ञान केंद्र अकोला चे संचालक प्रभाकर दौड सह विजय घोडे



