Uncategorized

शाळकरी पोरांसाठी तरी बस चालवा!

 महाराष्ट्र एसटी महामंडळाला आता घरघर लागली आहे.प्रत्येक डेपोतील दहा बस भंगारात जातात तेंव्हा चार बस नवीन मिळतात.रावते परिवहन मंत्री असतांना भाड्याने बस घेतल्या होत्या.शिवशाही नांव ठेवल्याने लोकांना खटकले नाही.शिवशाही शब्द वाचला की,मराठी माणूस बधीर होतो.महाराष्ट्र  सरकार भाड्याने बस घेते .उद्या मंत्रालय सुध्दा कोणाला तरी भाड्याने चालवायला देतील.शिंदे महाशयांनी फुकटची खीर वाटणे सुरू तर केले .असे  फुकट हॉटेलची खिरापत किती दिवस चालेल?पण शिंदेंना हवे आहे, एसटी महामंडळ पुर्ण डबघाईस  आणण्याचे श्रेय.
 जळगाव डेपोचे कर्मचारी जाणून आहेत , बोलून दाखवत आहेत कि, महामंडळ डबघाईस आणून, बरखास्त करून शहरातील मोक्याची जागा कॅश करता येईल.मुंबईतील  मध्यवर्ती जमीन बळकावण्यासाठी अनेक कापडमील बंद पाडणाऱ्यांचे हे चेले.
 जळगाव विभागीय कार्यालयात शिरताच दिसते की, मोडकळीस आलेल्या खुर्ची टेबल. तुटलेली कपाटे.संगीत गाणारे पंखे.पिचकारीने रंगवलेल्या भींती.जाणवते की,येथे एक हजार वर्षांपूर्वी कधीकाळी एसटी विभागीय कार्यालय असावे.आता त्याचे स्मारक असावे.आत बसलेले पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी असावेत.
टुटा हुआ घर और बिखरा हुआ संसार असला तरीही आत बसलेले कर्मचारी बांधव मात्र आपुलकीने बोलत होते.पोलिस कार्यालय,कोर्ट , महसूल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम  कार्यालय सारखी येथे रग दिसली नाही.पगार जेमतेम म्हणून चालतात जेमतेम.एक नसला तरीही दुसरा कारकून आगंतुक लोकांशी बोलत होता.

भडगाव जागृत जनमंच चे अध्यक्ष श्री अभिमन हटकर सोबत आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच चे शिवराम पाटील व राकेश वाघ मुद्दाम नियंत्रक भगवान जगनोर साहेबांना भेटलो.विनंती केली की, आमच्या शाळकरी पोरांसाठी शाळेच्या वेळेत बस चालू करा.जी आधी होती ती पुन्हा चालू करा.त्यांनी तसे मान्य केले.म्हणाले की, पंढरपूर ची तीर्थयात्रा करून बस गाड्या परत आल्या आहेत.आता तुमची विनंती वरुन बस चालू करू.
शिंदे महाशयांनी महाराष्ट्रातील सर्वच डेपोच्या काही बस पंढरपूर साठी विशेष गाड्या म्हणून सोडल्या होत्या.कारण या वारकरी यात्रेकरूंचे मत शिंदेंना हवे आहे.शाळकरी पोरांचे मतदान नसते.त्यामुळे पोरांची गैरसोय करून वारकरींचा अनुनय केला.आता सरकार मधे बसलेल्या मुख्यमंत्री व मंत्र्यांचे सर्वच हिशोब मतांसाठी असतात.अमळनेरचे आमदार दुर्दैवाने मंत्री बनले तर त्यांनी सुद्धा शाळकरी पोरांना गुलाम,हबशी बाजारात विक्रीसाठी आणून ठेवतात तसेच रस्त्यावर बसवून ठेवले होते.या वयातील बालकांना काय माहित का, मंत्री काय चीज असते.मला पस्तीस वर्षात कळले नव्हते कि, मंत्री म्हणजे सरकारी चोर असतो.जो सरकारची तिजोरी लुटतो.गडगंज संपत्ती जमवतो.त्यातील उष्टे तुकडे चेले चपाट्यांना फेकतो.याच तुकड्यांच्या आशेने मास्तरांनी बालकांना रस्त्यावर आणून उकिडवे बसवून ठेवले होते.
या अशाच बालकांच्या शाळेतील प्रवासासाठी आम्ही विभागीय नियंत्रक कडे विनंती केली.त्यांनी मान्य केली.

… शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button