Uncategorizedगुन्हेगारी

सरकारी फैल भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा चौघांना घेतले ताब्यात..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव.शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सरकारी फाईल भागात पैशाच्या हारजीतवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा मारून चौघा आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील व दबंग ठाणेदार विलास पाटील यांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली की स्थानिक सरकारी फाईल भागामध्ये पैशाच्या हारजीत वर 52 ताश पत्त्यावर जूगार सुरू आहे या माहितीवरून डी वाय एस पी विवेक पाटील यांच्या आदेशाने पोलीस नायक गजानन गीते नायक पोलीस कॉन्स्टेबल निलेश गाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी फैल भागामध्ये मध्यरात्री दोन वाजे दरम्यान मारून मोहम्मद जाफर मोहम्मद नजीर वय 43 वर्ष शेख नसीम शेख हकीम वय 32 , शेख सलमान शेख रहीम वय 29 आणि विनोद कचरू बागुल व 49 वर्षे सर्व राहणार सरकारी फैल शेगाव यांना पैशाच्या हार् जीतवर 52 तास पत्त्यावर जुगार खेळताना रंगी हात पकडले यावेळी आरोपीकडून नगदी 3090 रुपये, 52 ताश पत्ते किंमत वीस रुपये तसेच गावावर पडलेले 720 असा एकूण 3830 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला याबाबत पोलीस नायक गजानन गीते बकल नंबर 653 यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरुद्ध कलम 12 मुंबई जुगारबंदी कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button