चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला घेराव आंदोलन संपन्न

*समता सैनिक दला तर्फे**——————————-* *चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला घेराव आंदोलन संपन्न**आज 30/6/2023शुक्रवार रोजी समता सैनिक दलाच्या वतीने गौतम अहिरे, सांगवी ता. चाळीसगाव येथील पीडित तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन घेराव आंदोलन करण्यात आले* *पीडित गौतम आहिरे किरकोळ कारणावरून रांजणगाव येथील समाजकंटकांनी निर्दयपणे त्याच्यावर हल्ला करून दोघं पाय दगडाने ठेचलेत त्यात त्याचे दोघे पाय निकामी झालेत गौतम हा घरातील कमवता व्यक्ती आहे आणि त्याला जबर दुखापत झाली आहे…**समता सैनिक दलाचे**स्वप्नील जाधव यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक* *साहेबांकडे आरोपींना तात्काळ अटक करून 307 कलम व ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली व आंदोलनात उपसथित समाज बांधवांना संबोधित करताना म्हणाले की आपला समाज अन्याय झाल्यावर जागृत होतो पण अन्याय-अत्याचार होणार नाही यासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातुन एकत्रितपणे संघटनेत काम करावे… असे आवाहन जिल्हा प्रचारक स्वप्निल जाधव यांनी केले, व जमलेल्या समाज बांधवांकडून वर्गणी गोळा करून पीडित गौतम याच्या आईकडे सुपूर्त केली.*या प्रसंगी संघटनेचे कार्यकर्तेस्वप्नील जाधव,नितीन मारसाळे,दीपक बागुल,विशाल पगारे, ज्ञानेश्वर बागुल,निवृत्ती बागुल,राजू आहिरे,वहीद पठाण,रतन आहिरे, कुणाल आहिरे, राकेश बागुल ,बाबा चव्हाण,जिवन जाधव,सचिन जाधव,आदित्य जाधव,जितू महाले,भूषण नवगिरे,अक्षय जाधव, सागर निकम,राजू वाघ, जेष्ठ सैनिक महेंद्र जाधव,भाईदास गोलाईत,अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…*स्वप्नील जाधव**समता सैनिक दल**जिल्हा प्रचारक*



