Uncategorized

शेतीच्या वादामुळे दोन गटांमध्ये मारहाण

शेतीच्या वादामुळे दोन गटांमध्ये मारहाणस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव | शेताचा मालकी हक्क व ताबा घेण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील ३७ व इतर ३० जणांविरूध्द शेगाव ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत..इंद्रायणी ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विजय भाऊराव देशमुख यांच्याशी शेती मालकी हक्कावरून कोर्टात वाद सुरू आहे. इंद्रायणी पाटील ह्या मजुरांसह शेतात पेरणी करण्यास गेल्या असता, आरौंींनी तक्रारदार व त्यांच्या पतीला मारहाण करण्याकरिता आले. शेतावर आम्हाला ताबा करायचा आहे, अशा धमक्या दिल्या. पेरणीकरिता आणलेले खत व बियाण्यांची नासधूस केली, अशा तक्रारीवरून विजय भाऊराव देशमुख यांच्यासह गणेश रमेश देशमुख, दिनेश रमेश देशमुख, अमित रमेश देशमुख, अक्षय चंद्रकांत लाहुडकार, निलेश नरेंद्र खोंड, उमेश रमेश देशमुख, नागेश सुभाष देशमुख, वैभव प्रल्हाद देशमुख, अंकुश विजय देशमुख, संजय विजय देशमुख, सुभाष भाऊराव देशमुख, गौरव प्रमोद देशमुख, नागोराव देशमुख, राजू विनायक देशमुख, निशांत देशमुख, अजय सुभाष देशमुख, सुभाष नारायण देशमुख, योगेश सुभाष देशमुख, राजेश संपत बावस्कार, मुकुंद उल्हास देशमुख, नरेंद्र नागोराव देशमुख, आकाश बग्गन, वसीम पटेल, जाफर मिर्झा, वैभव जयंतराव देशमुख, साहील दिनेश देशमुख, गौरव राजाभाऊ देशमुख, एजा देशमुख, नासीर खाँ दुल्हे खाँ यांच्याविरूध्द कलम १४३, ३५२, ४२७, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.विजय देशमुख यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार शेतीच्या मालकी हक्कावरून विद्यमान कोर्टात वाद सुरू असून विजय देशमुख हे शेतीची वहीती करीत आहेत. या शेतात आरोपी शेतीची पेरणी करण्यास आले. आम्हाला मारण्यास आले. तसेच शिविगाळ केली व धमक्या दिल्या. फिर्यादीच्या रिपोर्टवरून ज्ञानेश्वर पाटील, उमेश झोळणे, मंगेश ढोले, श्रीधर पाटील, सुनील नामदेव शेगोकार, पांडुरंग पाटील, सचिन कडाळे यांच्याविरूध्द कलम १४३, ३५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button