बहुजन मुक्ती पार्टीची लोकसभा निहाय परिवर्तन यात्रा प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा ओव्हाळ यांची मुक्ताईनगर मध्ये सभेचे आयोजन ( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर प्रतिनिधी ) :-

सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच मे 2023 पासून ते दिनांक 28 जून 2023 पर्यंत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांत दादा ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निहाय परिवर्तन यात्रेला सुरुवात झालेली असून रावेर लोकसभा मतदार संघातील मुक्ताईनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा ओव्हाळ यांनी ईव्हीएम द्वारे घोटाळा करून भाजप आज सत्तेत आहे त्यांना आपल्या मतांची गरज भासत नाही तसेच आज महाराष्ट्रभरात जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगली भडकवल्या जात आहेत आणि ह्या दंगली सरकार नियोजित असल्याचं दिसून येत आहे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून संख्येच्या अनुपात आरक्षण दिले गेले पाहिजे लोकांना रोजगार दिला गेला पाहिजे लोकांचे आरोग्य रोजगार आणि शिक्षणाचा मोठा प्रश्न असताना देशभरात हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या मुद्द्यांना जाणून बुजून बाजूला सारले जात आहे हे बहुजनांनी लक्षात घेतले पाहिजे भारत देश कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांना 24 तास लाईट दिली गेली पाहिजे शेतमालाला हमीभाव दिला गेला पाहिजे परंतु आज देशभरात तसे होताना दिसत नाही उलट शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी नाडले जात आहे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार दिला जाईल परंतु खाजगीकरण करून तसेच कामगार कायद्यांमध्ये बदल करून होता नव्हता रोजगार काढून घेण्याचा षड्यंत्र या देशात सुरू आहे आणि या भाजपा सरकारला सत्तेतून बेदखल करायचं असेल तर या देशात महागठबंधन करावेच लागेल औरंग्याचे स्टेटस लावले म्हणून तुम्ही दंगली घडवता स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सुद्धा औरंग्याच्या अवलादी या देशात तयार झाले आहेत असे वक्तव्य करतात हे बोलणं तुमच्या पदाला तुम्हाला न शोभणारा आहे दंगली घडू नयेत यावर तुम्ही उपायोजना केली पाहिजे तसे न करता तुम्ही वाटेल ती वायफाय बडबड कशाला करता तुम्ही काय फडतूस राजकारणी आहात काय असा खडा सवाल त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केलेला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तुम्हाला समुद्रातील मजार दिसली परंतु या देशातील तीनशे रुपयांचा गॅस अकराशे बाराशे पर्यंत गेला तो तुम्हाला दिसला नाही का या देशातील वाढती बेरोजगारी तुम्हाला दिसत नाही का असे सुद्धा राज ठाकरे यांना यावर तुम्ही का बोलत नाही असे खडे बोल सुनावले या कार्यक्रमाचे उद्घाटक जामनेर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी सुद्धा आरएसएस आणि बीजेपी वर जोरदार हल्लाबोल केला तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरे यांनी मनुवादी व्यवस्थेवर तिखट प्रहार केला माजी प्रदेशाध्यक्ष मुख्याध्यापक संघ यु डी पाटील सर यांनी सांगितले की ईव्हीएम बंद झाल्याच पाहिजे ओबीसींची जाती आधारित जनगणना करून संख्येच्या अनुपातामध्ये आरक्षण दिले गेले पाहिजे भारत मुक्ती मोर्चा चे नितीन गाढे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रमोद सौंदळे जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी पवार तालुका अध्यक्ष ब्रिजलाल इंगळे आरबी परदेसी राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास पाटील प्रमोद तायडे संजय चौधरी एडवोकेट गजानन पाटील बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ता सुरेश कोळी ज्ञानदेव पाटील धनराज चव्हाण राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष जाकिर मिस्त्री सिद्धार्थ हिरोळे सुपडा हिरोळे पारस हिरोळे निलेश वानखेडे अरुण जाधव आतिक खान मनोज इंगळे जयराज इंगळे जुलमाबाई पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच असं कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन मुक्ती पार्टीचे विधानसभा प्रभारी राजू वानखेडे यांनी केले




