तेल्हारा ब्रह्माकुमारीज विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा.

*तेल्हारा ब्रह्माकुमारीज विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा.*
#योगा शिक्षिका डॉ.मोनिका तराळे कडून योग मार्गदर्शन#
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा येथे अंतरराष्ट्रीय योग दिवस २१जुन् बुधवार च्या सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला शहरातील सुपरिचित केरला योग प्रशिक्षित योगा शिक्षिका डॉ.मोनिका तराळे योग मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.साखरकर,प्रतिष्ठित व्यापारी गोपाल बाजोड,ब्रह्माकुमार श्याम भाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रमिला दीदींनी सर्व मान्यवराचे स्वागत केले.मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.डॉ मोनिका यांनी योग दिवसाचे महत्व सांगताना जागतिक स्तरावर भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट म्हणजे योग आहे.ऋषी मुनींनी योग साधनेच्या माध्यमातून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.जगातील असाध्य रोग नियमित योगभ्यास केल्याने समूळ नष्ट झाल्याची अनेक उदाहरणे देशातच नव्हे तर विश्वात बघावयास मिळतात.हा योगाचा वारसा पुढील पिढीला सुद्धा माहिती असावा यासाठी योग दिवस साजरा कऱण्यात येतो.प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी दिवसातून किमान अर्धा तास वेळ योग प्राणायाम करण्यासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.सर्वांना सहज करता येतील अशा योगाचे प्रत्यक्षिक डॉ मोनिका यांनी उपस्थितांकडून करवून घेतले. ब्रह्माकुमारी प्रमिला दीदींनी विद्यालयातुन् नियमित शिकविला जाणारा राजयोग हा मनुष्य आत्म्याचा परमात्म्याशी संबध स्थापित करण्याचा मार्ग आहे.शरीरिक तंदुरुस्तीसाठी योग आसने उपयुक्त आहेत तसे मानसिक,बौद्धिक तंदुरिस्ती व सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी राजयोग हा अत्यंत पभावी व परिणामकरक असल्याचे मनोगत प्रमिला दीदींनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन् ब्रह्माकुमारी स्नेहल दीदी तर आभार ब्रह्माकुमार श्याम भाई यांनी मानले.कार्यक्रमाला तेल्हारा सेवा केंद्राचे ज्ञानार्थी भाऊ बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी स्वयंस्फूर्तीने योग प्राणायाम केले.



