
ना.नितीनजी गडकरी यांनी जळगाव(जामोद)रेल्वे गेटच्या पुलाला दिली व्यासपीठावरच मंजुरी आमदार राजेश एकडे यांच्या मागणीला यश
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
///////////////////////////////
आधुनिक रस्ते व पायाभूत सुविधांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी ११ जून रोजी खामगाव येथे एका भव्यदिव्य कार्यक्रमात केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री.श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते अमरावती -चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ शेळद ते नांदुरा या ८१६कोटी रु किंमतीच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले
याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती
यावेळी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश एकडे यांनी आपल्या भाषणातूनच नांदुरा शहरातून जळगाव(जामोद) कडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे गेट मुळे तिथे तासनतास वाहतूक खोळंबून वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो म्हणून रेल्वे गेटवर तातडीने पूल (भुयारी मार्ग) बांधण्याची आवश्यकता आहे या मागणीसह वन टाईम इम्प्रूव्हमेण्ट मध्ये नांदुरा बायपास ची सुध्दा ना नितीनजी गडकरी यांच्याकडे मागणी लावून धरली
हाच धागा पकडीत ना गडकरी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की जळगाव(जामोद)रेल्वे गेट वरील पुलाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)तयार झाला असून लवकरच त्याचे टेंडर (निविदा)काढून हे काम मंजूर करून देईल त्याचबरोबर वन टाईम इम्प्रूव्हमेण्ट मध्ये नांदुरा बायपासला अप्रूव्हल (मान्यता) मिळाली असून त्याही कामाची लवकरच सुरुवात होईल असे सांगितले



