महाराष्ट्र

राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमी चा 14 यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि 25 गुरुवार रोजी साई मंगल कार्यालय साई मंदिर तेल्हारा येथे शासकीय सेवेत निवड झालेल्या 14 विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचा राजे संभाजी अकॅडमी च्या वतीने सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून 2023 मध्ये 14 विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली त्यानिमित्त त्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मातापित्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तसेच या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी राजे संभाजी अकॅडमी तेल्हारा शाखेचे संचालक सुधीर ताखोते सर यांचे आभार मानले आणि भरभरून कौतुक केले तसेच त्यांनी हाती घेतलेले कार्य यापुढे ही असेच कायम राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या व आशीर्वाद दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजे संभाजी स्पर्धा परीक्षा केंद्र अकोटचे संचालक राजीव खारोडे सर हे असुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजे संभाजी अकॅडमी तेल्हारा शाखेचे संचालक सुधीर ताखोते सर यांनी केले होते तसेच कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लासची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी गावंडे हिणे केले राजे संभाजी अकॅडमीचे माध्यमातून निवड झालेल्या 14 विद्यार्थ्यांचे पुढील प्रमाणे नावे आहेत1)खुशी धरमकार अकोला पोलीस 2) प्रज्ञा वाकोडे मुंबई पोलिस 3)चेतन खुमकर अकोला पोलीस 4)प्रफुल खोडे यांचे अकोला पोलीस आणि मुंबई पोलीस दोन्ही ठिकाणी निवड झाली 5)शुभम लोंढे अकोला पोलीस 6)राम सर घंगाळ अकोला पोलीस 7) उमेश वाकोडे अकोला पोलीस 8)विकास पवार यवतमाळ पोलीस 9)वैभव चंदन आर्मी बी आर ओ 10) अभिजीत पोहरकार भारतीय रेल्वे 11)श्रीकांत चव्हाण भारतीय रेल्वे12)रुपेश इंगळे भारतीय रेल्वे 13)विजय हिवराळे भारतीय रेल्वे 14)प्रदीप गवई भारतीय रेल्वे . या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे होते कि विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आला तसेच आई-वडिलांचा सत्कार हा राजे संभाजी अकॅडमीच्या वतीने आदरपूर्वक शाल श्रीफल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमात महत्त्वाचे असते अध्यक्षीय भाषण खारोडे सरांनी आपल्या भाषणात राजे संभाजी महाराजांचा इतिहास सांगत सुरुवात केली तसेच आपले भविष्य उज्वल करण्याकरिता विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावे यश संपादन नक्की करता येईल तसेच आत्मविश्वास खचु द्यायचा नाही. त्यानंतर राजे संभाजी अकॅडमी तेल्हारा शाखेचे संचालक ताकोते सर यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की जीवनात अडचणी खूप येत असतात आर्थिक परिस्थितीही कमकुवत असते अशा परिस्थितीवर मात करण्याकरिता मोठ्या हिम्मतीने संकटाचा सामना करायला पाहिजे तरच भविष्यात आपण यश संपादन करु शकु तसेच आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण सदैव ठेवायला पाहिजे असे ते आपल्या भाषणात बोलत होते. प्रज्ञाताई वाकोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्या म्हणाल्या की अकोला येथे मला खूप जास्त फि होती मला ती फी झेपत नसल्यामुळे मी तेथून परत आली आणि परत ताकोते सरांचे क्लास जॉईन केले सरांनी आमच्याकडून तीनशे रुपये महिन्याप्रमाणे फीज घेतली व आम्हाला स्पर्धा परीक्षेचे ज्ञान दिले , त्यांनी सरांचे खूप आभार मानले तसेच सर आर्थिक मागासलेले विद्यार्थ्यांकडून पैसे सुद्धा घेत नाहीत हे त्यांनी आपल्या भाषणात बोलत असताना सांगीतले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत कोरडे यांनी राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमी च्या वतीने सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button