जळगावा जिल्हामहाराष्ट्र

घाणखेड येथील साठ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

*घाणखेड येथील साठ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू* बोदवड:-(प्रतिनिधी): बोदवड तालुक्यातील घाणखेड येथील साठ वर्षीय शेतकरी सुरेश पुंडलिक वराडे यांचे आज दिनांक १७ मे रोजी निधन झाले आहेसुरेश वराडे हे शेतकरी आहेत आणि दररोज शेती काम करण्यासाठी ते शेतात जात असतात दिनांक १५ मे रोजी देखील ते नेहमीप्रमाणे शेतात गेले व शेती काम आटवून घरी आले तेव्हा त्यांना ऊन लागले होते.थकवा आल्याने त्यांनी घरी प्राथमिक उपचार केले पण फरक पडला नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन सलाईन लावून उपचार घेतले. मात्र दिनांक १७ मे रोजी सकाळी पाच वाजता त्यांच निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे व भाऊ वहिनी असा परिवार आहे.मनूर बु।। येथील अमजित पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यु पी वराडे यांचे भाऊ होत. संध्याकाळी ५ वाजता दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेसध्या उन्हाचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व इतर नागरिकांनी ऊन होण्याच्या अगोदर व संध्याकाळी कामे उरकावेत दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर निघू नये उष्माघाताने मृत्यू झाल्याची बोदवड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व बाहेर निघताना रुमाल टोपी व जास्तीत जास्त पाणी प्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button