महाराष्ट्र

मानव जिवन सुखी करण्यासाठी युवकांनी वाईट व्यसनाचा निरोप घ्या!संदिपपाल महाराज.,”””””””””””””””’””””’स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

संग्रामपूर/ तालुक्यातील वानखेड येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त समाजाला लागलेली व्यसनाची किड व भ्रष्टाचार मुक्त मतदारसंघ करण्यासाठी संदिपपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आठवडी बाजार मैदानात करण्यात आले होते. व्यसनमुक्त मतदारसंघ करण्यासाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी गावा गावात चालू केलेल्या प्रबोधनात्मक जनजागृती सप्ताह यात्रा कार्यक्रम वानखेड येथिल हजारो नागरिकांच्या उपस्थिती संपन्न झाला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रबोधनकार संदिपपाल महाराज व त्यांचे सहकारी यांचा प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महारांजानी बोलतांना सांगितले कि भ्रष्टाचार व व्यसन मुक्त मतदारसंघ करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांच्या कार्याला साथ द्या. मानवी जिवन सुखी व सुंदर करण्यासाठी युवकांनी व्यसनाचा निरोप घ्या असा सल्ला महाराज यांनी आपल्या प्रबोदनातुन दिला. महापुरुषांचे विचार आत्मसात करा, आलेल्या संकटाचा सामना करा, आत्महत्या करु नका, ढोंगी बाबा पासुन सावध रहा, शेतकरी शेतमजूरांसाठी अहोरात्र संघर्ष करणारे प्रशांत डिक्कर यांना साथ द्या‌. लवकरच चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास यावेळी महाराज यांनी बोलतांना दिला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रशांत डिक्कर यांनी आपले मत व्यक्त केले. मतदार संघाला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपवण्यासाठी व व्यसनमुक्त मतदारसंघ करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहो. पंरतु विरोधक जाणिवपूर्वक मला थांबवण्यासाठी माझ्यावर वेग वेगळे प्रयोग करित आहेत. शेतकरी, शेतमजुरांचे रक्त पिणाऱ्या भ्रष्टाचारी मंडळींचा बंदोबस्त करण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची गरज असल्याचे मत प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी संदिपपाल महाराज यांच्या सहकार्याला साथसंगत असलेले हार्मोनियम वादक गणेश पिसाट, तबला वादक राहुल सोनोने, साथसंगत नंदुभाऊ चांबट, सहकार्य किसनराव चोपडे यांचे सह हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास तराळे, प्रमोद मुरकर, गजानन माळोकार, प्रवीण रौंदळे, गणेश माळोकार, श्रीकृष्ण तराळे, दिलीप दुतोंडे, रवी देवकार, नारायण कुरवाडे, गजानन दाते , भगवान हागे, बाळु वाघ, निलेश तेल्हारकार ,संतोष गायकवाड, मधुकर ढोले, गजानन पांडव, अरुण बघे, गुलाबराव लोणाग्रे,राजेश पाखरे, गोपाळा अमझरे, भारत टोपरे, यांच्या सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव दामधर यांनी केले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील महिला व बहुसंख्य समाजबांधव तसेच भरगच्च युवकांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button