बुलढाणामहाराष्ट्र

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना आ.ॲड. फुंडकरांनी केले अभिवादन !

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना आ.ॲड. फुंडकरांनी केले अभिवादन !:::::::::::::::::::::::::::::::स्टार‌ भारत लाईव‌ महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि ऋषिकेश देठे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,शोभयात्रेचे भाजपा कडून भव्य स्वागतखामगाव ::- धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना जयंती निमित्ताने आ. अँड. आकाश फुंडकरांनी अभिवादन केले तसेच याप्रसंगी शहरात निघालेल्या शोभा यात्रेचे भाजपा कडून भव्य स्वागत करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला आ अँड आकाश फुंडकरांनी माल्यार्पण केल्यानंतर या शोभयात्रेला शिवाजी नगर येथून सुरवात झाली. या शोभायात्रेत मराठमोळ्या वेशभूषेत मुलींनी लाठी काठी, भाला ,तलवार बाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच मावळे व छत्रपती संभाजी महाराज यांचे वेशभूषेतील घोडेस्वार युवकही आकर्षण ठरले. याप्रसंगी आ अँड आकाश फुंडकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी तानाजी व्यायाम शाळेचे सचिव ओंकारआप्पा तोडकर, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, प्रवीण कदम, सुरेश घाडगे, संजय अवताडे, गणेश जाधव, रमाकांत गलांडे, गणेश सोनोने, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, नरेंद्र मुळीक, पप्पू तोडकर, शैलेश सोले, आशिष सुरेका, राहुल घाडगे, मयूर घाडगे, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या शोभयात्रेचे मोहन चौकात भाजप च्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. मा. नगरसेवक राकेश राणा, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख आदी भाजयुमो व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी मराठा पाटील युवक समिती कडून काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीतही आ अँड आकाश फुंडकर यांनी सहभाग घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. या रॅलीत समितीचे अध्यक्ष गजानन ढगे पाटील, सचिन ठाकरे पाटील, बाळू पहुरकर, अनिल मेतकर, नरेश भारसाकळे, श्रीधर ढगे, केशव बानाइत, सतीश सोळंके, मोहन घुईकर, छोटू पाटील, सतीश पाटील, अविनाश थेटे, शिवाजी भोसले, पुरुषोत्तम अंभोरे, मनोज बानाइत, सुनील पाटील, श्याम अढाव आदी मराठा पाटील युवक समिती चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजी नगर येथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप मराठा पाटील सभागृहात झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button