बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
कर्नाटक निवडणुकीतील विजयाबद्दल शेगावमध्ये काँग्रेसचा जल्लोष

(नमस्कार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय
झाल्याबद्दल शहरात शनिवारी, १३ मे रोजी शहर काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे खामगाव मतदारसंघ पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे शेगाव शहराध्यक्ष माजी नगरसेवक किरण देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा मीराताई माळी, शहरध्यक्षा कविता राजवैद्य, प्रणिता धामंदे, स्नेहलता दाभाडे आदींची उपस्थिती होती.



