बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महत्त्वाची बातमी म्हसाये सरांच्या “उन्हाळी छंद क्लासेस”ला आज पासुन

*.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी.
तेल्हारा दि10.
महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना तथा नटराज आर्ट अकॅडमी व श्री. शिवाजी विद्यालय तेल्हारा द्वारा पुन्हा एकदा…. पालकांच्या आग्रहास्तव तेल्हारा शहरांमध्ये एक महिन्याच्या कालावधी करिता वय वर्ष ( 4 ते 16 ) गटातील विद्यार्थ्यांकरिता चित्र,शिल्प, हस्त, या विषयावर आधारित ( चित्रकला, हस्ताक्षर, आर्ट- अँड, क्राफ्ट , क्लेवर्क ) या विषयाचे क्लासेसला आजपासून सुरुवात  करण्यात येत आहे. मागील आठवड्यात आनंदात पार पडलेल्या क्रांती समर कॅम्पच्या समारोपीय कार्यक्रमाचे तेल्हारा शहरातील पालक व विद्यार्थ्यांना मिळालेले उत्स्फूर्त यश पाहता…. पालकांनी पुन्हा एकदा आग्रह धरला आहे. तेल्हारा शहरातील गेल्या 18 वर्षापासून कलाक्षेत्रात कार्य करणारी एकमेव संस्था म्हणजे नटराज आर्ट अकॅडमी”.नटराज आर्ट अकॅडमी तेल्हारा शहरातील विद्यार्थ्यांकरीता नेहमीच कलेचे दालन उभारणी करत असते. या दालनामध्ये येऊन विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. आपल्या अंगी कला बाणावी व कलेची चुणूक दाखवावी आणि यशाची उत्तुंग भरारी घ्यावी. त्याकरिता श्री. उमेश म्हसाये सर ( कलाशिक्षक ) यांनी तेल्हारा वाशियांकरिता आपल्या विद्यार्थ्यांनी “”कलाक्षेत्रात नवक्रांती घडवावी”” म्हणून पुन्हा ही संधी उपलब्ध करून दिली आहे. (अकॅडमी मार्फत वर्षभरात एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा चे तसेच इयत्ता बारावी नंतर फाउंडेशन कला विषयीचे क्लासेस घेण्यात येत असतात यामध्ये वयाची अट नाही. )
आज दिनांक 10 मे 2023 रोजी पासून संध्याकाळी 4. 30 ते 6.00 या वेळेत श्री.शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे एक महिन्याकरिता “उन्हाळी छंद क्लासेस” राबविण्यात येत आहे. या क्लासेस करिता सर्व विद्यार्थी पालकांनी सहभागी व्हावे. तसेच क्लासेस च्या वतीने श्री. शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे आयोजित चित्र व हस्त प्रदर्शन एक महिन्याकरिता सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनीचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे संचालक उमेश दयारामजी म्हसाये  यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button