गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथील ४० जणांवर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शहरातील नगरपालिकेमध्ये ८ मे रोजी जमावाने जाऊन कार्यालयात ठिकठिकाणी मांसाचे तुकडे व घाण टाकून धुडगूस घातल्याप्रकरणी अभियंता संजय मोकासरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी माजी नगरसेवक दिनेश शिंदे व अमोल चव्हाण यांच्यासह ३० ते ४० जणांवर ९ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पाबाबत न.प. अभियंता संजय मोकासरे यांनी पोस्टेला तक्रार दिली की, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ते शहरात क्षेत्रीय पाहणी करत असताना ८ मे रोजी सकाळी ११.३० वा.

त्यांना न.प.

मुख्याधिकान्यांनी फोन करून, आपण कार्यालयात पोहोचावे, तेथे नव्हता. काही लोक गोळा झाले, ते बाजारातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रासमोरील अनधिकृत मांस विक्रीची दुकाने दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी करत आहेत असे सांगितले.

मोकासरे यानी न.प. कार्यालय गाठले. तेथे उबाठा गटाचे माजी नगरसेवक दिवाकर ऊर्फ दिनेश शिंदे, अमोल चव्हाण, शे जब्बार शे. अय्युम व इतर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेले ३० ते ४० लोक गेटवर होते. आम्हाला सीओंना भेटायचे आहे. आम्हाला बाकी कोणाशी बोलायचे नाही, असे म्हणून

हा जमाव कोणाशी बोलायला तयार

तेव्हा तेथे उपस्थित न.प.तील कर व प्रशासक अधिकारी, इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत विचारणा केली असता त्यानी सांगितले की, शेगाव येथील वरील आरोपी व सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेले इतर ३० ते ४० लोकानी एकत्रीत गोळा होऊन त्यांनी सोबत आणलेले मांसाचे तुकडे कोंबडीचे पंख कचरा व मुख्यधिकान्यांच्या कक्षासमोर, बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागामध्ये आणून टाकला आहे.

आठवडी बाजारातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रासमोरील मांस

विक्रीची दुकाने दुसरीकडे स्थलांतरित करा, अशी त्या जमावाची मागणी आहे. जमावाशी पोलिस विभागातर्फे चर्चा केली असता, ती दुकाने उद्या सकाळी न हटविल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही व यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असे सांगण्यात आले. घटनेबाबत फिर्यादींनी स्वतः खात्री करून मुख्याधिकान्यांना फोनद्वारे माहिती दिली. अशा लेखी तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी उपरोक्त ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास एपीआय बर्वे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button