बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती जल्लोषात साजरी*

* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.तेल्हारा शहरांमध्ये दि.22 शनिवार रोजी वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक तथा धर्मगुरू महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वर यांची ट्रॅक्टर मध्ये प्रतिमा स्थापन करून मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच विद्युत रोषणाई करून शोभायात्रा काढण्यात आली.महात्मा बसवेश्वर हे 12 व्या शतकातील वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक तथा धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर- बागेवाडी या गावात 1131 साली अक्षय तृतीयेला झाला होता बसवेश्वरांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा संदेश दिला आहे आपल्या देहालाच देवालय माना देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे अशी शुद्ध विचारसरणी महात्मा बसवेश्वरांची होती. महात्मा बसवेश्वर यांचा जयघोष करत शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने टॉवर चौकातून प्रवास करत असताना भगवान परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम जोशी यांच्यासह समाजातील इतर बांधवांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर यांचा जयंती उत्सव साजरा करण्याकरिता समाजातील बंधू भगिनींनी अथ्थक परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button