महाराष्ट्रमुक्ताईनगर

कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर आणि पोलीस नाईक विनोद सोनवणे यांची कौतुकास्पद कामगिरी

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :- दिनांक 15 /4/ 2023

सविस्तर वृत्त असे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर शहरातील मुख्य चौक ज्या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजन महापुरुषांच्या प्रतिमा बसविण्यात आलेल्या आहे हा प्रवर्तन चौक भीम अनुयायांनी उत्कृष्ट असा सजविलेले होता या मुख्य चौकात अशोक चक्राची कापडाद्वारे उभारणी करण्यात आलेली होती परंतु जयंती चा कार्यक्रम आटोपल्या नंतर साधारणता एक वाजे च्या दरम्यान वादळी वारा सुटल्यामुळे या ठिकाणी लावलेले अशोक चक्राचे काही कापड खाली आलेले होते आणि या ठिकाणाहून मालवाहू गाड्यांची वाहतूकही सुरू होतील ही बाब सर्वप्रथम गस्ती पथकातील पोलीस नाईक विनोद सोनवणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वाहतूक थांबविली आणि

मुक्ताईनगर चे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांना कळविले राहुल बोरकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता पोलीस अंमलदार शरद तडवी, पोलीस अंमलदार दीपक चौधरी ,पोलीस अंमलदार सुरेश पाटील, पोलीस अंमलदार दीपक ढाकरे, रवींद्र मेढे, गोपनीय शाखेचे रवींद्र धनगर. या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन खाली आलेले सर्व कापड

व्यवस्थित करून एकदा परत अशोक चक्र पूर्व स्थितीत तयार केले आणि पुढील होणारा अनर्थ टळला या कामगिरीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महत्त्वाचे म्हणजे काही वर्षा अगोदर याच चौकात एक दुर्घटना घडली होती आणि त्यावेळेसचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली होती तशीच मेहनत आज पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी घेऊन पोलीस प्रशासन कर्तव्यदक्ष होते आहेच आणि राहणारच असा संदेश दिलेला आहे असे दिसते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button