जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मुक्ताईनगर मध्ये जल्लोष मात्र ऐन वेळेवर विजेचा खोळंबा भीम अनुयायांच्या संतप्त प्रतिक्रिया

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-

वृत्त असे की बहुजन महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव समिती द्वारे मुक्ताईनगर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेलेले होते आणि 14 एप्रिल या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथील मुख्य चौक म्हणजेच प्रवर्धन चौकात गेल्या आठ दिवसापासून सजावटीचे काम तरुणाई करत होती एवढी मेहनत करून विद्युत रोषणाई तसेच देखावा तयार केलेला होता सर्व भीम अनुयायी या दिवशी प्रवर्तन चौकात एकत्र येऊन महा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करतात परंतु याच दिवशी मुक्ताईनगर मधील विज खंडित झालेला दिसून आला आणि सर्वत्र अंधार असल्यामुळे भीम अनुयायांचा पुरता हिरमोड झालेला दिसून आला आणि आजच्या दिवशी विद्युत पुरवठा दोन ते तीन तास कसा काय खंडित झाला असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विद्युत महामंडळ च्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता कुठले तरी यंत्र जळाल्यामुळे पुरवठा खंडित झालेला आहे आम्ही प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button