जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सरपंच आरती इंगळे यांची वनमंत्र्यांकडे तक्रार

कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर : वायला ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरून वढोदा वनविभागाने छापेमारी केली खरी मात्र पुढील कारवाईसाठी वेळकाढूपणा करत संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सरपंच आरती इंगळे यांनी वनमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले वायला गाव हे वढोदा वनक्षेत्राच्या हद्दीत येते. सागवान लाकडी फर्निचर बनवून त्याची अवैध विक्री करणारे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावातील हे अवैध उद्योग बंद करण्यासाठी महिला सरपंच आरती राहुल इंगळे यांनी वनविभागाकडे तक्रार केली होती.१ एप्रिल रोजी वढोदा वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी पथक तयार करून वायला गावात ठिकठिकाणी छापेमारी करत ३ घनमीटरचे २५० सागवानी नग आणि ३ मशीन जप्त केले. सदर कारवाई झाल्यानंतर आठवडा उलटला तरीही एकही संशयितास अटक करण्यात आली नाही.वनमंत्र्यांकडे तक्रार – याप्रकरणी आरती इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे तक्रारीचा मेल केला असून वनविभाग वायला प्रकरणात वेळकाढूपणा करत संशयितांना पाठीशी घालत असल्याचे म्हटले आहे. आरोपी माहीत असताना सुद्धा साधी चौकशीही केली नाही तसेच एकालाही अटक करण्यात आली नाही.संशयितांची मुजोरी – वनविभागाने अद्याप ठोस कारवाई केली नसल्याने संशयित आरोपींना कायद्याचा धाक उरला नाही. ते मोकाट फिरत असून तक्रारकर्त्या सरपंच आरती इंगळे यांचेवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.वनविभागातील दोषींवर कारवाईची मागणी – एका छापेमारीत सागवान लाकडाचा इतका मोठा साठा हाती लागला. पत्र्यांच्या शेडमध्ये फर्निचर बनवण्याच्या तीन मशीन जप्त करण्यात आल्या. हे उद्योग बिन बोभाटपणे कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते हा प्रश्न उपस्थित केला आहे. सरपंचांनी तक्रार करण्याआधी वनविभागाने स्वतःहून कारवाई का केली नाही. की यामागे काही आर्थिक हितसंबंध होते याची चौकशी होऊन कर्तव्यात कसूर करणारे वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षक यांचेवर निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारीत केली आहे.तक्रारीची प्रत मुख्य सचिव, प्रधान वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक धुळे वनवृत्त, उप वनसंरक्षक जळगाव, आदींना मेल करण्यात आली आहे.चौकशी सुरू आहे – वायला प्रकरणात कोणतीही कसूर ठेवली जात नाही. संशयितांवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, वनपरिक्षेत्र वढोदा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button