बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
भाजपाचा 44 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार निवडून येईल- आ.ॲड.आकाश फुंडकर
स्थापना दिनी केला भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संकल्प़
जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून घ्याती प्राप्ते केलेल्या भाजपाचा 44 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात आज खामगांव येथे साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ़ कार्यकर्त्यांच्या हस्ते भाजपा कार्यालय टॉवर चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 साली स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. 1984 च्या सर्वसाधारण निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा 2 लोकसभा सिट जिकल्या होत्या. 1984 ते 1996 हा अत्यंत खडतर प्रवास भाजपाने केला तरी देखील सत्तेत भाजपा येऊ शकले नाही केवळ एका मताने भाजपा सत्तेपासून दूर राहील. परंतु तरी देखील सतत प्रयत्नरत़ राहून संघर्ष करुन पुन्हा 1998 मध्ये सत्तेत आले ते सरकार केवळ वर्षभर टिकले. त्यानंतर निवडणुका होऊन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजीच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. आज देशात सतत दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सत्तेत आहे. केवळ 2 लोकसभा सिट वरुन 302 लोकसभा सिटवर पोहचलेला प्रश्ऩ असून जगातील सर्वात मोठा पक्ष अशी ख्याती भाजपाने प्राप्त़ केली आहे.
भाजपा कार्यालयात ध्वजारोहणानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नडडा व देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उद़बोधनाचे प्रसारण करण्यात आले यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते. यानंतर खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, “गुजरात मध्ये सलग 7 वेळा म्हणजे 1995 ते 2023 पर्यंत भाजपा सत्तेत आहे. गोव्यात सतत 3 ऱ्यांदा, उत्त्र प्रदेशात सतत दुसऱ्यांदा, मध्यप्रदेशात, आसाम, अरुणाचल प्रदेश,हरियाणा,कर्नाटक,मणीपुर, त्रिपुरा,उत्तराखंड, या 11 राज्यात भाजपा नेतृत्वातील सरकार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात भाजपा समर्थीत सरकार आहे. त्यामुळे दोन खासदारांची पार्टी म्हणून हिणवणाऱ्यांना ही खुप मोठी चपराक आहे. अशा भारतीय जनता पार्टीला तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी अनेक नेत्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आपले प्राण देखील गमावले आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक सदस्याला अभिमान आहे की तो भाजपा परिवारात सामिल आहे”असेही आमदार ॲड आकाशदादा फुंडकर म्हणाले.
यानंतर भाजपा तर्फे 44 व्या स्थापना दिना निमीत्य़ पुन्हा एकदा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची सरकार निवडून आणण्याचा संकल्प़ केला. तसेच प्रत्येक बुथवर कमीत कमी 5 ठिकाणी भाजपाचे निवडणुक चिन्ह़ कमळ रंगविणे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम बुलढाणा जिल्हयात खामगांव येथे शहिद भगतसिंग चौकातील एका भिंतीवर कमळ रंगवून केली.यावेळी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा, मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभाग 6 चे शक्ती केंद्र व बूथ प्रमुख उपस्थित होते.



