महाराष्ट्रविदर्भ

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए २५० बुल. )

श्री संस्थेद्वारा १२९ वा श्रीरामनवमी उत्सव दि. २२/ ०३/२०२३ ते ३०/०३/ २०२३ पर्यंत धार्मिक प्रथा- परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी ५.३० ते ६ काकडा, ७.२५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात श्री ह.भ.प. धनेश्वर बुवा ढोरे, गोरेगांव, श्री ह.भ.प. पंकज बुवा पाटील, भानगुरा, श्री ह.भ.प. संजय बुवा ठाकरे, कौंडण्यपूर, श्री ह.भ.प. पंकज बुबा पवार पसरणी, श्री ह.भ.प. प्रकाश बुवा जंजीरे, पिपळवाडी, श्री ह.भ.प. बळीराम बुबा दौड, अकोला, श्री ह.भ.प. गोविंद बुवा चौधरी, केकतनिंभोरा, श्री ह.भ.प. गणेश बुवा हुंबाड, महागांव श्री ह.भ.प. श्रीराम बुवा ठाकूर, परभणी व श्री ह.भ.प. संजय बुबा लहाने आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले.

तसेच श्री अध्यात्म रामायण

स्वाहाकारास चैत्र शु. ५ ला करण्यात आली. प्रारंभ होवून चैत्र शु. १ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे श्रीहरी कीर्तन होवून नामस्मरणाचे जय जयकारात, टाळ, मृदंग, नगारा व मंगलवाद्याचे गजरात श्रीरामजन्मोत्सव संपन्न झाला. अशारितीने

यावर्षी श्रीरामनवमी उत्सवांत ८३६ वि एकूण ३९४७४ वारकरी वेवून गेलेत.

यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १९६ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या, जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजनप्रसादाची व्यवस्था विसावा संकूल येथे

तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्री रामनवमी उत्सव सपन्न होऊन १,५०,००० चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. श्रीकृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे, असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात आले. ( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button