महाराष्ट्र

झाडेगावच्या पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे रस्ते झाले हागुडे

*झाडेगावच्या पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे रस्ते झाले हागुडे*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव पंचायत समिती अंतर्गत येणारी झाडेगाव ग्रामपंचायत ही पाटलाची ग्रामपंचायत म्हणून ७२ खेळ्यात नावलौकिक म्हणून उदयाला आलेली ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा पदभार सौ स्वाती गजानन माळी यांनी स्वीकारला तेव्हापासून गावातील व गावालगत चे रस्ते हे लोकांच्या शौचामुळे व गावातील सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे व सरपंच स्वाती माळी यांच्या नियोजन शून्य कामामुळे झाडेगाव ग्रामपंचायत ला मिळालेल्या ग्रामस्वच्छता अभियानाची फार बिकट परिस्थिती झालेली आहे. लोकांना रस्त्याने जाण्या-येण्याकरिता त्रास. शाळेतील विद्यार्थ्यांना निंबा येथे शिक्षणाकरिता जाण्याला याच रस्त्याने जावे लागते. लोकांना शेतीचा माल सुद्धा याच रस्त्याने आणावा लागतो. बैलबंडी सुद्धा या रस्त्याने जात नाही. या रस्त्यावर लोक गावात झालेल्या शुभ व कार्यप्रसंगी जेवणाच्या उष्ट्या पत्रावळ्या नाली त फेकत आहेत त्यामुळे गावात दुर्गंधी पसरलेली आहे. व गावात बिमारी पसरण्याची शक्यता आहे.तरीही शेतकरी स्वतःचा जीव मुठीत धरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मरण यातना याच रस्त्याने सहन करत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button