युको बँकेने क्लिअर झालेला चेक पुन्हा बँकेत सादर केल्याने ग्राहकाला झालेली नुकसान भरपाई आणि कोर्ट खर्चा करिता पाच हजार रुपये देण्याचे आदेश

युको बँकेने क्लिअर झालेला चेक पुन्हा बँकेत सादर केल्याने ग्राहकाला झालेली नुकसान भरपाई आणि कोर्ट खर्चा करिता पाच हजार रुपये देण्याचे आदेश.
( बुलढाणा ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल) बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रोकडे) खामगाव_स्थानिक रहिवासी तसेच सेवानिवृत्त अभियंता विनोद पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी यश ट्रेडर्स कडून एसी खरेदी केला होता व त्याकरिता कुलकर्णी यांनी त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र मधील बचत खात्याचा रुपये 51 हजार 500 चा चेक या यश ट्रेडर्स च्या च्या नावाने दिला होता व तो दिनांक 9 .6 .2020 रोजी युको बँकेमार्फत क्लिअरिंग साठी सादर करण्यात आला व क्लिअरिंग क्लिअर होऊन यश ट्रेडर्स यांना रीतसर पैसे सुद्धा मिळाले होते व तक्रार करता कुलकर्णी यांचे खात्यातून सदर रक्कम वजा सुद्धा करण्यात आली होती असे असताना युको बँकेने दिनांक 17. 6 .2020 रोजी पुन्हा तोच चेक क्लिअरिंग साठी सादर केले म्हणून तक्रारकर त्याचे बचत खात्यातून सदर धनादेश परत गेल्याने त्या संदर्भात कुलकर्णी यांच्या खात्यातून चेक परत गेल्या कारणाने खात्यात चार्जेस शुल्क आकारून रुपये 354 वजा करण्यात आले यात कुलकर्णी यांचे कोणते चूक नसताना दंड भरावे लागल्याने



