गुन्हेगारी

वीज चोरणाऱ्या पाच जणांवि रुध्द गुन्हा

वीज चोरणाऱ्या पाच जणांवि रुध्द गुन्हे दाखलस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधरीत्या वीज वाहिनीवर आकोडे टाकून वीजचोरी करण्यात येत आहे. महावितरणच्यावतीने वीजचोरी करणाऱ्या १२ जणांवर महावितरणच्या पथकाने गुन्हे दाखल केले. तसेच त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. शेगाव तालुक्यातील १२ वीजग्राहकांनी ११ हजार ६५८ रुपयांची वीज चोरली. त्यांना एक लाख ७५ हजार ८६५ रुपये दंड ठोकण्यात आला. त्यापैकी ६९,२०० रुपये वसूल करण्यात आले असून इतर ५ जणांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये नागझरी व चिंचोली येथील प्रत्येकी २ ग्राहक तर टाकळीहाट येथील १ वीजग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या वीजचोरीचे प्रकार वाढले आहेत. याचा बंदोबस्त करण्यासाठी महावितरणकडून वीजचोरी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. उपकार्यकारी अभियंता अजय मोहता यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव येथील ग्रामीण विद्युत महावितरण सहायक अभियंता संदीप ढोले व कर्मचाऱ्यांच्या पथकाने गोळेगाव, नागझरी, चिंचोली, टाकळी विरो, टाकळी हाट, झाडेगाव, गायगाव येथे धाड टाकली. वीजचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वीजचोरी विरोधात कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button