वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका महत्वपूर्ण बैठक

*वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका महत्वपूर्ण बैठक
*भुसावळ :- दि.24/02 /2023 रोज शुक्रवार रोजी सकाळी 10:30 वाजता स्थळ – शामाप्रसाद मुखर्जी उद्यान,कोर्टा समोर भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा. विनोदभाऊ सोनवणे असतील बैठकीचे विषय १) भुसावळ तालुका कार्यकारिणी तयार करणे २) भुसावळ तालुक्यातील आढावा घेण्यात येईल आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर घेण्या संदर्भात नियोजन ३)गाव तेथे शाखेचे आयोजन व पक्ष बांधनी संबंधित चर्चा करण्यात येणार ४) निष्क्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पदमुक्त करुण युवा क्रियाशिल कार्यकर्त्यांना नियुक्त करण्याबाबत चर्चा करण्यात येणार५) भुसावळ तालुक्यात टप्प्याटप्प्याने सभासद नोंदणी अभियान राबविणे ६) नविन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व आयत्या वेळेस आलेल्या विषयावर चर्चा करण्यात येणार बैठकिचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा प्रभारी रविकांत वाघ,उत्तर महाराष्ट्र सचिव सुनिल सुरवाडे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,कामगार युनियन चिटणिस बालाजी पठाडे,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनाताई आराक हे असतील तरी बैठकिस सर्व तालुका, शहर, ग्रामशाखा, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे बैठकीत झालेल्या निर्णयावर नंतर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही तरी सर्वांनी तालुका जनरल बॉडी व सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, कामगार आघाडी आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक व समर्थक सर्वांनी या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून पक्ष वाढीस व चळवळ सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, ही विनंती बैठकिस उपस्थितीचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव टेंभुर्णीकर,जिल्हा सचिव विजय मालविय,जिल्हा सह संघटक प्रकाश सोनवणे,जिल्हा सह सचिव सुनिल ठाकुर,भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे (मेजर) यांनी केले



