विदर्भशेती

आत्मग्रस्त शेतकर्यांच्या कुंडूबीयाना केली मद्दत

*आत्मग्रस्त शेतकर्यांच्या कुंडूबीयाना केली मद्दत* मुकेश संतोष हातोलेस्टारभारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका अकोल:-आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केल्याबददल वाडेगाव येथील जय गजानन कॉमर्स कोचिंग क्लासेस व युवा संकल्प प्रतिष्ठान वाडेगाव येथे युवा व्याख्याते श्री प्रशांत महाराज ठाकरे यांचे हस्ते नाम फाउंडेशन मंगेश गोळे यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या 4 वर्षांपासून आपल्या अकोला जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नाम फाउंडेशनचे काम वाढले असून. नाम फाउंडेशनचे विदर्भ व खानदेश चे समनव्यक तथा प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे तथा अकोला जिल्हा समनव्यक माणिकराव शेळके व तालुका प्रतिनिधी मंगेश गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यातील 45 विधवा व एकल महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले असून 149 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी 25 हजाराची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. याच बरोबर लोनाग्रा येथील शहीद जवान सुमेध गवई यांच्या कुटुंबाला 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात आली असून करोना च्या लोकडाऊन काळात 500 कुटूंबाला जीवनावश्यक किट (किराणा मालाचे) वाटप त्यांच्या घरोघरी जाऊन करण्यात आले. असे अनेक उपक्रम सेवाभावाने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर राबविले जातात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button