बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथील वैकुंठधाममधील जीर्ण शवदाहिनी बदलल्या; आमदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचे गोटू शेठ धन्नावत यांनी मानले आभार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:येथील वैकुंठधाम (स्मशानभूमी) येथील अत्यंत जीर्ण आणि खराब झालेल्या तीन शवदाहिनी (लोखंडी पिंजरे) बदलून नवीन शवदाहिनी बसवण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे. हे जनहिताचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल आमदार मनोज कांयदे, मुख्यअधिकारी अरुण मोकळ, नगराध्यक्ष माधुरीताई शिपने आणि सर्व नगरसेवकांचे स्थानिक नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

देऊळगाव राजा येथील वैकुंठधाममधील तीन शवदाहिनी (पिंजरे) खूप खराब आणि जीर्ण अवस्थेत होते. ते अनेक ठिकाणी तुटल्यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जागरूक नागरिक व अर्जदार कैलास धन्नावत, रविंद्र मोहिते, सुरज गुप्ता आणि सुरेंद्र अंबूसकर यांनी या शवदाहिनी तात्काळ बदलून नवीन बसवण्यात याव्यात, अशी मागणी नगरपरिषदेकडे केली होती.

नागरिकांची अडचण ओळखून आमदार मनोज कांयदे, मुख्याधिकारी अरुण मोकळ, नगराध्यक्ष माधुरीताई शिपने व सर्व नगरसेवकांनी तात्काळ पावले उचलली आणि वैकुंठधाममध्ये नवीन शवदाहिनी बसवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करून घेतले.

हे काम पूर्ण झाल्याबद्दल कालिका माता दुर्गा उत्सव मित्र मंडळाच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास धन्नावत उर्फ गोटू शेठ व सहकाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

नवीन शवदाहिनीमुळे आता नागरिकांची होणारी मोठी गैरसोय दूर झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button