रयतेच्या हृदयातील राजकीय सत्ता आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात -सौरभ खेडेकर


**रयतेच्या हृदयातील राजकीय सत्ता आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात -सौरभ खेडेकर **. जिल्हा प्रतिनिधी खान्देश तीन दिवसीय दौऱ्यामध्ये बोदवड इथून पहिली बैठक घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातील संवाद बैठक कार्यक्रमा अंतर्गत बोदवड येथील अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये सौरभ खेडेकर संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना रयतेच्या हृदयातील विचार जनमानसात बळकट करून रुजवायचा असेल तर राज सत्तेशिवाय गत्यंतर नाही राजकीय सत्ता आपल्या ताब्यात असण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकीय पाऊल टाकले येणाऱ्या पुढील काळात संभाजी ब्रिगेडची संघटनात्मक बांधणी करून पुढील काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जि.प .,प .स महानगरपालिका नगरपालिका ताकदीने लढवाव्यात अशी भूमिका मांडली यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर बालाजी जाधव प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड ,योगेश पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ,योगेश पाटील जिल्हा अध्यक्ष बुलढाणा ,संजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पाटील मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष हे होते पुढे बोलताना खेडेकर महापुरुषाची बदनामी जाणीवपूर्वक करून प्रबोधनाची चळवळ कुठपर्यंत आलेली आहे लिटमेस स्टेट हे लोक करत असतात, महापुरुषाच्या बदनामी न थांबल्यास महाराष्ट्रात पुन्हा भांडारकर घडेल असे सांगितले डॉ बालाजी जाधव प्रदेश संघटक यांनी संभाजी ब्रिगेडची विचारधारा समजून घेऊन गाव तेथे शाखा करून तिथे तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्थानिक प्रश्न विकासात्मक इतर मुद्दे संघटने बांधणीसाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अनंता वाघ ,कार्याध्यक्ष संजय पाटील ,निवृत्ती ढोले ,तालुकाध्यक्ष अशोक निकम ,शहराध्यक्ष शैलेश वराडे,सचिव प्रशांत सुरडकर ,गणेश मुलांडे ,वैभव गावंडे, गणेश सोनवणे ,दीपक खराटे ,गणेश पाटील, जितेंद्र पाटील ,अमर पाटील, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.




