खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सेवा संकल्प अभियान जळगाव जामोद तहसील मध्ये उत्साहात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी ,

रतन भगत.

जळगाव (जामोद) दिनांक ७/१०/२६
सविस्तर वृत्त असे की, भारताचे जगप्रसिद्ध असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ७ ऑक्टोबर२०२६ रोजी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जळगाव जामोद तहसील कार्यालयात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी विविध लोकाभिमुख उपक्रमांनी सजलेले विशेष असा कार्यक्रम संपन्न झाला. देशातील नागरिकांना विविध अशा प्रकारच्या शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत प्रशासनाकडून विविध प्रकारच्या सेवा दिल्यावर भर देण्यात आला. या विशेष प्रकारच्या सेवा संकल्प अभियाना अंतर्गत सेवाशेतू शिबिर, महसूल व वन हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ, वेगवेगळ्या प्रकारची आवश्यक अशा प्रकारची प्रमाणपत्रे व सेवा सुविधांचे वाटप तसेच समाज उपयोगी कार्य आणि स्वच्छता अभियान यासारखे वेगवेगळे उपक्रम या सेवा संकल्प अभियानातून राबविण्यात आले. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा व मार्गदर्शन मिळाले.
हा सेवा संकल्प अभियानाचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार पवन पाटील जळगाव जामोद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायब तहसीलदार व्ही. एल. पारस्कर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर अशोक सरादे यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी अव्वल कारकून कांतीलाल जाधव यांनी विशेष अशा प्रकारचे परिश्रम घेतले. यावेळी अ .का. निवडणूक विभागाचे सत्यविजय जाधव, सहाय्यक महसूल अधिकारी सतीश उगले, रामेश्वर म्हसाळ, शिवाजी गाल सेटवर, सारंगधर वावटडीकर, आयुष काटकर, विनायक रहाटे, गजानन म्हात्रे, मंडळ अधिकारी राठोड, शेतू संचालक, तसेच तहसील कार्यालयातील बरेच अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button