खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अवैध लाकूड तस्करी करणाऱ्या वाहनावर वनविभागाचा छापा; लाकडासह वाहन जप्त

स्टार भारत लाईव एक्सप्रेस

प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव

खामगाव : वनपरिक्षेत्र
कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळगाव राजा परिसरात ५ ऑक्टोबर रोजी रात्री अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक करणारे मालवाहू वाहन वनविभागाच्या पथकाने जप्त केले. या कारवाईत वाहनासह लाकूड असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन खामगाव वनपरिक्षेत्राचे पश्चिम वनपाल यशवंत देशमुख हे पथकासह पिंपळगाव राजा परिसरात गस्तीवर असताना मालवाहू वाहनामधून बेकायदेशीररीत्या लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे
वनविभागाच्या पथकाने संबंधित वाहनावर पाळत ठेवून ते अडवले. तपासणीदरम्यान एमएच २८ बी ६१७३ क्रमांकाच्या मालवाहू वाहनामध्ये आंबा तसेच इतर वृक्षांची तोड केलेले लाकूड आढळून आले. या लाकडाची किंमत २० हजार १२० रुपये असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वाहन आणि लाकूड ताब्यात घेऊन ते खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. या प्रकरणी वाहन चालक शेख शाबीर (रा. पिंपळगाव राजा) याच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्या मार्गदर्शनात पश्चिम वनपाल यशवंत देशमुख व त्यांच्या पथकाने केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button