बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून देऊळगाव राजा येथे विविध कुटुंबांना सांत्वनपर भेटी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :राष्ट्रवादी काँग्रेसचे(श.प) पक्ष चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज देऊळगाव राजा शहराचा दौरा करून, काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या शहरातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींच्या व कार्यकर्त्यांच्या आप्तेष्टांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

डॉ. शिंगणे यांनी देऊळगाव राजा नगर परिषदेचे नगरसेवक श्री. शिवाजी मेहेत्रे यांच्या काकू, श्री. बाबुराव नरोडे यांच्या मातोश्री, तसेच शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख श्री. अनिल चित्ते यांचे वडील स्व. जगन्नाथ चित्ते यांच्या निधनाबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मेहेत्रे, नरोडे आणि चित्ते परिवारातील सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले व “आम्ही सर्वजण आपल्या दुःखात सहभागी आहोत,” अशा भावना व्यक्त केल्या.

“ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि या तिन्ही परिवारांना या मोठ्या दुःखातून सावरण्याची व हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या भावना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या सांत्वनपर भेटीदरम्यान डॉ. शिंगणे यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button