अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बनावट खोटे व्हिडिओ बनवून नगर परिषदेची बदनामी करणाऱ्यांच्या बदमाशा उघड

बनावट व खोटे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करा पाणी पुरवठा सभापती यांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना पत्र

हिवरखेड (वार्ताहर ):- खोटे व बनावट व्हिडिओ बनवून व फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकून नगरपरिषदेची व सत्ताधारी गटाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी हिवरखेड नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती अजीज खान यांनी नगराध्यक्ष व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. खोटे व्हिडीओ बनवून व फोटो काढून जनतेची दिशाभूल करण्याचा जणू काही ट्रेंडच हिवरखेडात सुरू असल्याचे पाणीपुरवठा सभापती अजिज खान यांनी केलेल्या एका स्टिंग ऑपरेशन वरून आता उघड झाले आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाणीपुरवठा सुरू असताना पाण्याची प्रचंड नासाडी होत असून सदर पाणी नालीत कसे वाहत आहे हे दाखवणारा एक खोटा व बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.त्याची तात्काळ दखल घेत पाणीपुरवठा सभापती अजित खान जमीर खान यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले मात्र तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार उघडकीस आला. ज्या घरमालकाच्या खासगी नळ कनेक्शन मधून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्या घर मालकाला बोलावण्यात आले. घरमालकाने आमचे घर बंद असून आम्ही येथे राहत नाही असे सांगून आम्ही घेतलेले पाणीपुरवठ्याचे खासगी नळ कनेक्शनचा पाईप आमच्या घराच्या बाहेर असून तो बदमाश्या करून तोडण्यात येऊन त्याचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा थेट आरोपच पाणीपुरवठा सभापती यांच्या समोर केला.पाणी पुरवठा सभापती अजिज खान यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असता सदर नळ कनेक्शन खोळसरपणाने तोडून व्हिडिओ काढल्याचे निष्पन्न झाले. अजित खा यांनी सोशल मीडियावर पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल करणारे पराभूत मानसिकतेतून नगरपरिषदेची बदनामी करण्याच्या हेतूने व जनतेची दिशाभूल करण्यासाठी हलक्या दर्जाचे राजकारण करत असल्याची टिका केली असून हा खोडसाळपणा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या आशयाचे पत्र त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले आहे . हिवरखेड शहरातील कधी दूषित पाणी पुरवठ्यावरून,कधी बांधकामावरून तर कधी कुत्रे पकडण्यावरून व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर टाकून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणारे खोटे व बनावट तर नाहीत ना असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.या बाबतीत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
प्रतिक्रिया –
1)माझ्या घरच्या ज्या नळावरून सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल करण्यात आला वास्तविक आम्ही त्या घरात राहत नाही. ते घर बंद असून व्हिडीओ बनवणाऱ्याने नळ कनेक्शनचा घराबाहेरील पाईप तोडून तो व्हिडीओ बनवला. पाण्याची नासाडी असा प्रकार कुठेच घडला नाही-अख्तरअली अब्रारअली
2) हिवरखेड नगर परिषदेचा लोकाभीमुख व गतिमान कारभार काही विरोधकांना खुपत असून नगर परिषद व पाणी पुरवठा सभापतीना बदनाम करण्यासाठी विनाकारण असे खोटे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात येत आहेत. हे खोटे व्हिडीओ व फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे पत्र मी मा. नगराध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
अजीज खान -पाणी पुरवठा सभापती नगर परिषद हिवरखेड

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button