भाजपच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव मही : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशस्तरीय सूचनेनुसार ‘विकसित संकल्प सभा’ व भाजपच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन ७ ऑक्टोबर २०२६ रोजी तृप्ती लॉन्स, धोत्रा-नंदई फाटा येथे करण्यात आले. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष लाईव्ह संवादाचे प्रसारण करण्यात आले.
कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. बैठकीला विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सविताताई पाटील, माजी जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, मोर्चा संपर्कप्रमुख सुनील कायंदे, जिल्हा संघटन मंत्री दत्ता पाटील, जिल्हा चिटणीस युवराज भुसारी, जिल्हा सरचिटणीस प्रकाश गवळी, जिल्हा सरचिटणीस श्रीराम मुंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रदेश, जिल्हा व मंडळ स्तरावरील पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहून सहभाग नोंदविला. संघटनात्मक कामकाजाचा आढावा, आगामी उपक्रमांचे नियोजन तसेच बूथ व शक्तिकेंद्र पातळीवरील संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांबाबत उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे पाठपुरावा करणे आणि नागरिकांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे, याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षलागवड, लावलेल्या वृक्षांचे संगोपन, जलसंवर्धन आणि परिसर स्वच्छता यांसारखे उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला.
संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, बूथनिहाय कामकाजाचा आढावा घेणे आणि आगामी उपक्रमांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या संकल्पनेचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवा नेते गणेश नागरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधत नियोजनात सहभाग घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे, नगरपालिका उपाध्यक्ष वनिता पुतळा, राजेश भुतडा, गजानन घुले, जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे, एकनाथ काकड, संपर्कप्रमुख निशिकांत भावसार, अलका धणावत, खंडू मांटे, भगवान नागरे, निलेश बंगाळे, शंकर उगलमुगले, प्रभाकर नागरे, मंडळाध्यक्ष शिवाजी वाघ, आनंद देशमुख, कृष्णाजी सपकाळ, मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष भारतीताई इंगळे, संगीता मोगरकर, शहराध्यक्ष अनुराधा मैंध्द्रे, शहर उपाध्यक्ष रेखा पवार, कृष्ण शिंगणे, प्रतीक्षा नागरे, सरपंच गणेश हांडे, युवा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर चेके, तालुका मंडळाध्यक्ष वर्षा बोरकर, शंकर तलबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



