बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करूया : आमदार श्वेता महाले पाटील…

आवाज न्यायाचा
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली. तालुका. प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या सेवायात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने खामगाव येथील श्रीहरी लॉन येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या मंत्रावर सेवा, सुशासन आणि जनकल्याणाला प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी १०० टक्के व्याप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, डीबीटी आणि आधार प्रमाणीकरणामुळे योजनांमध्ये पारदर्शकता वाढली आहे. २०१४ पासून आतापर्यंत सुमारे २५ कोटी नागरिक गरिबीच्या रेषेतून बाहेर आले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणाला मोदी सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून ८१ कोटींपेक्षा अधिक नागरिकांना मोफत रेशन, जनधन योजनेतून ५८ कोटींपेक्षा अधिक बँक खाती, तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना विनातारण कर्जाची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ४ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना पक्की घरे, उज्ज्वला योजनेतून सुमारे ११ कोटी महिलांना गॅस जोडणी आणि लखपती दीदी अभियानातून ३ कोटींपेक्षा अधिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम झाल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड यांसह विविध योजनांच्या माध्यमातून थेट मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान निधीतून ११ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹४.३ लाख कोटींचे हस्तांतरण झाले असून, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ₹३ लाखांवरून ₹५ लाख करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सुलभपणे भांडवल उपलब्ध होत असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी नमूद केले.

आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रातही केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण काम केले आहे. आयुष्मान भारताच्या माध्यमातून ६० कोटींपेक्षा अधिक आरोग्य विमा कार्ड, मिशन इंद्रधनुषमधून ५.४ कोटींपेक्षा अधिक मुलांचे लसीकरण, तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून कोट्यवधी नागरिकांना सुरक्षा कवच मिळाले आहे. स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि सौभाग्य योजनेमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.

डिजिटल इंडिया आणि सुशासनाच्या माध्यमातून भारताच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. भारतनेटच्या माध्यमातून २.१४ लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडल्या गेल्या असून, डिजिटल डॅशबोर्ड आणि सरकारी ई-मार्केटप्लेसमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे. तंत्रज्ञान हे आज सामान्य नागरिकाच्या सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम बनले असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या योजनांना गती देत विकासकामांना चालना दिली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करावे, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प केला आहे. हा केवळ सरकारचा संकल्प नसून प्रत्येक भारतीयाचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. ‘We will do it Modiji!’ हा विश्वास व्यक्त करत आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे,” असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी यावेळी सांगितले.

या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, खामगाव नगराध्यक्षा अपर्णाताई फुंडकर, मोहनजी शर्मा, जिल्हा प्रभारी निवेदिताजी चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button