शिक्षक भारती संघटना ठाणे महानगरपालिका ठाणे अध्यक्ष श्री . सचिन शेलवले व नवोदित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

ठाणे – (सचिन शेलवले )दिनांक 25/9/2026 रोजी ठाणे जिल्हा शिक्षक भारती संघटनेची बांधणी व विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून आज ठाणे महानगरपालिका ठाणे क्षेत्रामध्ये शिक्षक भा
रती संघटनेची तालुकास्तरावरची कार्यकारणी प्रसिद्ध करण्यात आली .
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात तालुका अध्यक्ष म्हणून सचिन शेलवले यांची निवड करण्यात आली असून प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव असलेले, प्रशासकीय कार्यालयांमध्ये शिक्षकांची बाजू अतिशय प्रामाणिकपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे, उत्तम प्रकारचे वकृत्व असणारे, पत्रकारितेचा अनुभव असणारे त्याचप्रमाणे शिक्षक भारतीमध्ये या अगोदर संघटक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करून आपल्या कार्याशी प्रामाणिक राहणारे उत्तम व जाणकार, विश्वासू असणाऱ्या शिक्षकाची ठाणे महानगरपालिका क्षेत्रात तालुकास्तरावर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष यांची अध्यक्ष यांना सहकार्य करण्यासाठी व अल्पसंख्यांक शाळा मधील शिक्षकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळणारे, उत्तम प्रकारचे नेतृत्व गुण असणारे नईम शेख यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे . त्यांनाही प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. श्री .तुकाराम कमलाकर देसले सर यांनी अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न जिल्हास्तरापासून ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून आपल्या कार्याची चांगल्या प्रकारे ओळख निर्माण केलेली आहे .त्यामुळे त्यांची सचिव या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच टी ई टी / सीटीईटी परीक्षेत सात वेळा उत्तीर्ण असलेले व दोन- वर्षांपूर्वीच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळेमध्ये नियुक्त झालेले खान सर यांना टीईटी धारक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत व अडचणी संदर्भात चांगली माहिती असल्याने तसेच कॉलेज जीवनात त्यांनी संघटनात्मक कार्य केलेले असल्यामुळे व उत्तम कलागुण असणारे, शांत व शिस्तप्रिय या गुणांची ओळख असणारे त्यांची संघटक या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तुकाराम वेखंडे सर, काशिनाथ कथोरे सर, विलास घुडे सर,मुंडे सर यांची शिक्षक भारती सदस्य या पदावर नियुक्ती करण्यात आली. आज सर्वांचा नियुक्ती प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला व पुढील कामकाजाची रूपरेषा समजावून सांगण्यात आली. ठाणे जिल्हा सचिव श्री . नामदेव बांगर सर यांनी सर्व शिक्षकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक भारती ठाणे महानगरपालिका ठाणे संघटनेची शिफारस ठाणे जिल्हा प्राथमिकचे अध्यक्ष सुरेश विशे सर, ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री . एकनाथ तारमळे सर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती .पदाधिका-यांनी पाठविलेल्या शिफारशीला एक मताने मंजुरी देऊन ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शिक्षक भारती संघटनेची आज कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन . पुढील त्यांच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या . सर्व शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा खुप खुप आभार .लवकरच कल्याण तालुका कार्यकारिणी ही जाहीर होणार आहे .



