खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

उपचारांनी फरक न पडल्याने तरुण बेपत्ता; मुक्ताईनगर परिसरात खळबळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

बेपत्ता तरुणाचा शोध; मुक्ताईनगर परिसरात चिंतेचे वातावरण

मुक्ताईनगर :
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील २३ वर्षीय युवक पंकज मधुकर इंगळे हा मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, कुटुंबीयांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज इंगळे हा गेल्या चार वर्षांपासून उजव्या पायाच्या गंभीर आजाराने त्रस्त होता. विविध ठिकाणी उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तो मानसिकदृष्ट्याही खचलेला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याची माहितीही समोर आली आहे.

दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्णाई फाटा येथील एका हॉटेलजवळून तो अचानक निघून गेला. जाताना त्याने आपल्या आईकडून २०० रुपये घेतले होते. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाईक व परिचितांकडे शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

बेपत्ता युवकाचे नाव पंकज मधुकर इंगळे (वय २३) असे असून तो उचंदे, ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे. त्याची उंची सुमारे ५ फूट, रंग सावळा, चेहरा चपटा, डोळे मोठे असून उजव्या पायाने लंगडत चालतो, अशी ओळख सांगण्यात आली आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस अधिक तपास करीत असून, संबंधित युवकाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button